Soya Milk : सोयाबीनपासून दूध निर्मिती; पोषणमूल्यांमुळे असते विशेष मागणी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : कोरोना महामारीनंतर लोक आपल्या आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणात (Soya Milk) जागरूक झाले असून, दुग्धजन्य पदार्थांकडे त्यांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे मागील काही काळापासून सोयाबीनपासून बनवल्या जाणाऱ्या सोयामिल्कची (Soya Milk) मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र हे सोयाबीनपासून दूध तयार कसे होते? त्यास बाजारात किती दर मिळतो? याबाबतची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.

सोयामिल्क (Soya Milk) हे कोलेस्ट्रॉल आणि लॅक्टोज (दुग्धशर्करा) विरहित असून, त्यात मोठ्या प्रमाणात फाइटोकेमिकल्स असतात. त्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणून संबोधले जाते. सोयमिल्कची मागणी प्रामुख्याने साखरेची समस्या असलेल्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पावडर स्वरूपात ग्राहकांकडून अधिक मागणी असून, त्यामुळे ते अधिक टिकाऊ असतात. त्याचा वाहतूक खर्च कमी असतो आणि तसेच त्यास जास्त साठवणूक खर्च नसतो.

देशात सोयामिल्कचे अनेक प्लांट आहे. जिथे सोयाबीनपासून दूधनिर्मिती केली जाते. मागील काही वर्षात भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थान आणि दिल्ली येथील मेसर्स रॉयल प्लांट सर्व्हिसेस यांनी एकत्रितपणे एक सोयामिल्कचा प्लांट उभारला आहे. या प्रकल्पाची क्षमता ही तासाभरात सोयाबीनपासून 100 लिटर दुधनिर्मिती करण्याची आहे. या प्रकल्पामध्ये चांगला रंग आणि गुणवत्तापूर्ण सोयामिल्क पावडरच्या उत्पादनासाठी प्रक्रिया विकसित करण्यात आली आहे. या प्रकियेमध्ये सोयामिल्कचे उकळवून सुखवले जाते. आणि त्यापासून पावडरनिर्मिती केली जाते.

कसे बनते दूध? (Soya Milk Production Demand In India)

प्रकल्पातील मोठ्या कुकरमध्ये 120 अंश सेल्सिअसपर्यंत सोयाबीनपासून बनवलेले दूध तापवले जाते. सोयामिल्क म्हणजे सोयाबीनचा रस होय. त्यासाठी सर्वप्रथम सोयाबीनची चांगल्या प्रतीच्या दाण्यांची निवड केली जाते. हे सोयाबीनचे दाणे पाण्यात भिजवले जातात. यानंतर या दाण्यांना लिपोऑक्सीनेज आणि ट्रिप्सिन यांसारख्या रसायनांचा वापर करत शिजवले जाते. त्यानंतर ते दूध स्वरूपात तयार होते.

किती होते उत्पादन

भोपाळ येथील या प्रकल्पाला संशोधनानुसार प्रॉसेसिंग स्टैंडर्ड को मेसर्सने बायो न्यूट्रिएंट पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे फर्मला चांगल्या गुणवत्तेच्या सोयामिल्क पावडरचे उत्पादन करणे आणि आणि प्रोटिनयुक्त पावडरला मोठ्या प्रमाणात मागणी नोंदवली गेली आहे. कंपनी सध्या दरवर्षी 100 टन सोयामिल्क पावडरचे उत्पादन करत असून,त्यास सरासरी 225 रुपये प्रति किलोग्राम दर मिळतो आहे. तसेच या भोपाळ येथे तयार होणाऱ्या या सोयामिल्कला विदेशी बाजारात निर्यातीसाठी मोठी मागणी असते.

error: Content is protected !!