हॅलो कृषी ऑनलाईन : आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात (Soyabean Bajar Bhav) मोठी घसरण झाली आहे. अकोला बाजार समितीत आज (ता.6) सोयाबीनला कमाल 4780 रुपये ते किमान 4000 तर सरासरी 4400 रुपये प्रति क्विंटल दर (Soyabean Bajar Bhav) मिळाला आहे. मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी (ता.30) सोयाबीनला अकोला बाजार समितीत कमाल 5155 ते किमान 4000 तर सरासरी 5000 हजार रुपये इतका दर मिळाला होता. त्यामुळे मागील सहा दिवसांमध्ये अकोला बाजार समितीत सोयाबीनच्या दरात 375 रुपये प्रति क्विंटल इतकी घसरण नोंदवली गेली आहे.
राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्येही दरात (Soyabean Bajar Bhav) मागील आठवड्याच्या तुलनेत घसरण झाली आहे. सोलापूर बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4850 ते किमान 4800 तर सरासरी 4850 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत कमाल 4727 ते किमान 4650 रुपये तर सरासरी 4850 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत कमाल 4831 ते किमान 4350 रुपये तर सरासरी 4701 रुपये प्रति क्विंटल, हिंगोली बाजार समितीत कमाल 4800 ते किमान 4500 रुपये तर सरासरी 4650 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ बाजार समितीत कमाल 4790 ते किमान 4405 रुपये तर सरासरी 4597 रुपये प्रति क्विंटल, वाशीम बाजार समितीत कमाल 4750 ते किमान 4625 रुपये तर सरासरी 4650 रुपये प्रति क्विंटल, बुलढाणा बाजार समितीत कमाल 4750 ते किमान 4000 रुपये तर सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ बाजार समितीत कमाल 4790 ते किमान 4405 रुपये तर सरासरी 4597 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
आवक वाढल्याने घसरण (Soyabean Bajar Bhav 6 Dec 2023)
दरम्यान, दरातील घसरणीमागे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या सोयाबीनची बाजारात आवक होत असल्याचे सांगितले जात आहे. कारण अकोला बाजारात समितीत आज 4233 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. जी 30 नोव्हेंबर रोजी 2441 क्विंटल इतकी नोंदवली गेली होती. अशाच पद्धतीने राज्यातील अन्यही बाजार बाजार समित्यांमध्ये आज आवकेचा जोर काहीसा वाढलेला पाहायला मिळाला. यंदा सोयाबीन पिकाला अल्प पावसाचा फटका बसला आहे. त्यात आता दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सोयाबीन बाजारात नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.