Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरात चढ की उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने सोयाबीनला (Soyabean Bajar Bhav) यावर्षीच्या खरीप हंगामासाठी 4600 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव निर्धारित केला आहे. मात्र, मागील महिनाभरापासून राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर हे हमीभावापेक्षा कमी असून, याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आज राज्यातील लातूर ही एकमेव बाजार समिती वगळता इतर कोणत्याही बाजार समितीत सोयाबीनला हमीभावाइतका दर मिळालेला नाही. इतकेच काय तर राज्यातील सोयाबीन दर पाहता सरासरी 4100 ते 4400 रुपये प्रति क्विंटल इतका दर (Soyabean Bajar Bhav) मिळत आहे.

4400 ते 4600 रुपये दर कुठे? (Soyabean Bajar Bhav In Maharashtra)

लातूर बाजार समितीत (Soyabean Bajar Bhav) आज कमाल 4660 ते किमान 4451 रुपये तर सरासरी 4550 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. देवणी बाजार समितीत आज कमाल 4590 ते किमान 4517 रुपये तर सरासरी 4553 रुपये प्रति क्विंटल, औराद शहाजानी बाजार समितीत आज कमाल 4500 ते किमान 4480 रुपये तर सरासरी 4490 रुपये प्रति क्विंटल, बार्शी बाजार समितीत आज कमाल 4500 ते किमान 4450 रुपये तर सरासरी 4450 रुपये प्रति क्विंटल, मेहकर बाजार समितीत आज कमाल 4440 ते किमान 4000 रुपये तर सरासरी 4200 रुपये प्रति क्विंटल, तुळजापूर बाजार समितीत आज कमाल 4425 ते किमान 4425 रुपये तर सरासरी 4425 रुपये प्रति क्विंटल, माजलगाव बाजार समितीत आज कमाल 4422 ते किमान 4000 रुपये तर सरासरी 4375 रुपये प्रति क्विंटल, हिंगोली बाजार समितीत आज कमाल 4400 ते किमान 4050 रुपये तर सरासरी 4400 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत आज कमाल 4170 ते किमान 4050 रुपये तर सरासरी 4300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

4200 ते 4300 रुपये दर कुठे?

जिंतूर बाजार समितीत आज कमाल 4370 ते किमान 4200 रुपये तर सरासरी 4325 रुपये प्रति क्विंटल, गेवराई बाजार समितीत आज कमाल 4366 ते किमान 4316 रुपये तर सरासरी 4330 रुपये प्रति क्विंटल, वाशीम बाजार समितीत आज कमाल 4360 ते किमान 4200 रुपये तर सरासरी 4250 रुपये प्रति क्विंटल, भोकरदन बाजार समितीत आज कमाल 4350 ते किमान 4250 रुपये तर सरासरी 4300 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज कमाल 4325 ते किमान 4250 रुपये तर सरासरी 4287 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत आज कमाल 4200 ते किमान 4060 रुपये तर सरासरी 4165 रुपये प्रति क्विंटल, अमळनेर बाजार समितीत आज कमाल 4200 ते किमान 4000 रुपये तर सरासरी 4200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांची बाजाराकडे पाठ

दरम्यान, दरातील या घसरणीमुळे शेतकऱ्यांनी बाजारात सोयाबीन (Soyabean Bajar Bhav) विक्रीला आणणे बंद केल्याने, आवक पूर्णतः घटल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला लातूर या बाजार समितीत विक्रमी 18490 क्विंटल आवक होत आहे. तर अकोला, अमरावती, वाशीम या बाजार समित्यांमध्ये आज 2000 ते 3000 क्विंटल इतकी कमी आवक नोंदवली गेली आहे. या काही निवडक बाजार समित्या वगळता अन्य बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक ही 200 ते 400 क्विंटल इतकी होत आहे. सोयाबीनला दरच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजाराकडे पाठ फिरवली आहे.

error: Content is protected !!