Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दर 5000 हजारांच्या पुढे; पहा आजचे राज्यातील भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनला (Soyabean Bajar Bhav) सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटलहून अधिक दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (Soyabean Bajar Bhav) समाधानाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली बाजार समितीत सोयाबीनला बुधवारी (ता.29) कमाल 5225 ते किमान 4700 तर सरासरी 4960 रुपये प्रति क्विंटल, लासलगाव बाजार समितीत सोयाबीनला कमाल 5140 ते किमान 3800 तर सरासरी 5080 रुपये प्रति क्विंटल, तर परभणी जिल्ह्यातील पूर्णा बाजार समितीत सोयाबीनला कमाल 5135 ते किमान 5000 तर सरासरी 5100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

बुधवारी (ता.29) राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला मिळालेला दर पुढीलप्रमाणे आहे. जालना बाजार समितीत सोयाबीनला कमाल 5100 ते किमान 4500 तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल, लातूर जिल्ह्यातील मुरुड बाजार समितीत सोयाबीनला कमाल 5051 ते किमान 4950 तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर बाजार समितीत सोयाबीनला कमाल 5000 ते किमान 5000 तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल, नांदेड जिल्ह्यातील मुखेड बाजार समितीत सोयाबीनला कमाल 5175 ते किमान 5150 तर सरासरी 5150 रुपये प्रति क्विंटल, बीड बाजार समितीत सोयाबीनला कमाल 5100 ते किमान 4950 तर सरासरी 5027 रुपये प्रति क्विंटल, बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई बाजार समितीत सोयाबीनला कमाल 5131 ते किमान 4800 तर सरासरी 5050 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण (Soyabean Bajar Bhav In Maharashtra)

लातूर जिल्ह्यातील देवानी बाजार समितीत बुधवारी (ता.29) सोयाबीनला कमाल 5160 ते किमान 5100 तर सरासरी 5130 रुपये प्रति क्विंटल, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर बाजार समितीत सोयाबीनला कमाल 5100 ते किमान 5000 तर सरासरी 5054 रुपये प्रति क्विंटल, परभणी बाजार समितीत सोयाबीनला कमाल 5075 ते किमान 4950 तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल, तर लातूर जिल्ह्यातील औरड शहाजणी बाजार समितीत सोयाबीनला कमाल 5060 ते किमान 5010 तर सरासरी 5035 रुपये प्रति क्विंटल, सोलापूर बाजार समितीत सोयाबीनला कमाल 5115 ते किमान 4900 तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल, संगमनेर बाजार समितीत सोयाबीनला कमाल 5000 किमान 5000 तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल, राहाता बाजार समितीत कमाल 5053 ते किमान 4955 तर सरासरी 5000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यामुळे बुधवारी अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्रीस आलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

error: Content is protected !!