Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरात चढ की उतार? पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन दरात (Soyabean Bajar Bhav) झालेली घसरण अद्यापही कायम असून, आज अनेक बाजार समित्यांमध्ये सरासरी 4400 ते 4500 रुपये प्रति क्विंटल दर सोयाबीन मिळाला आहे. मागील महिन्याच्या सुरुवातीला कमाल 5000 रुपये प्रति क्विंटल मिळणारा दर सध्या 4500 ते 4600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आल्याने सोयाबीन उत्पादक (Soyabean Bajar Bhav) शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

आजचे राज्यातील बाजारभाव (Soyabean Bajar Bhav Today 10 Jan 2024)

अमरावती बाजार समितीत आज सोयाबीनची 4074 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4613 ते किमान 4500 तर सरासरी 4556 रुपये प्रति क्विंटल दर सोयाबीन मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज सोयाबीनची 51 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4536 ते किमान 4500 तर सरासरी 4516 रुपये प्रति क्विंटल, तुळजापूर बाजार समितीत आज सोयाबीनची 125 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4650 ते किमान 4650 तर सरासरी 4650 रुपये प्रति क्विंटल, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर बाजार समितीत आज सोयाबीनची 1950 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4700 ते किमान 4200 तर सरासरी 4550 रुपये प्रति क्विंटल, हिंगोली बाजार समितीत आज सोयाबीनची 500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4681 ते किमान 4250 तर सरासरी 4465 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीने रोजचे सोयाबीन बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता. यवतमाळ बाजार समितीत आज सोयाबीनची 304 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4620 ते किमान 4450 तर सरासरी 4535 रुपये प्रति क्विंटल, बीड जिल्ह्यातील आंबेजोबाई बाजार समितीत आज सोयाबीनची 410 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4723 ते किमान 4650 तर सरासरी 4680 रुपये प्रति क्विंटल, बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर बाजार समितीत आज सोयाबीनची 467 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4651 ते किमान 4475 तर सरासरी 4565 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील काटोल बाजार समितीत आज सोयाबीनची 219 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4601 ते किमान 4265 तर सरासरी 4450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची अवस्था

दरम्यान, सोयाबीनच्या दरासोबतच (Soyabean Bajar Bhav) बाजार समित्यांमध्ये आवक देखील घटली आहे. मागील आठवड्यात बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक काहीशी वाढलेली होती. मात्र आता या आठवड्यात त्यात घट दिसून आली आहे. बाजारभावात झालेल्या घटीमुळे आज शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये कमी प्रमाणात सोयाबीन आणल्याचे दिसून आले. दर घसरणीमुळे शेतकऱ्यांनाही सोयाबीनची विक्री करावी की नाही? असा संभ्रम निर्माण झाला आहे.

error: Content is protected !!