Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरात सुधारणा नाहीच; सरकारचे आठमुठे धोरण कारणीभूत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन दरात वाढ (Soyabean Bajar Bhav) होण्याऐवजी उत्तरोत्तर घट दिसून येत आहे. आजही राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर कमाल 4400 ते 4600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान घरंगळलेला दिसून आला. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांचा पाय आणखीच खोलात चालला असल्याचे पाहायला मिळत आहे. अकोला बाजार समितीत आज सोयाबीनची सर्वाधिक 4350 क्विंटक आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4580 ते किमान 4200 तर सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल दर (Soyabean Bajar Bhav) मिळाला आहे.

सर्वाधिक दर मिळालेल्या बाजार समित्या (Soyabean Bajar Bhav Today 18 Jan 2024)

अमरावती जिल्ह्यातील चिखली बाजार समितीत सोयाबीनची (Soyabean Bajar Bhav) आज 1210 क्विंटक आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4741 ते किमान 4250 तर सरासरी 4495 रुपये प्रति क्विंटल, बीड बाजार समितीत सोयाबीनची आज 96 क्विंटक आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4670 ते किमान 4620 तर सरासरी 4638 रुपये प्रति क्विंटल, लातूर जिल्ह्यातील जळकोट बाजार समितीत सोयाबीनची आज 232 क्विंटक आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4682 ते किमान 4271 तर सरासरी 4461 रुपये प्रति क्विंटल, परभणी जिल्ह्यातील ताडकळस बाजार समितीत सोयाबीनची आज 203 क्विंटक आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4675 ते किमान 4500 तर सरासरी 4600 रुपये प्रति क्विंटल, हिंगोली बाजार समितीत सोयाबीनची आज 1000 क्विंटक आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4645 ते किमान 4181 तर सरासरी 4413 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

अशाच पद्धतीने रोजचे सोयाबीनचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता.

सर्वाधिक आवक झालेल्या बाजार समित्या

अकोला बाजार समितीनंतर आज वर्धा जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत 4000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4615 ते किमान 4450 तर सरासरी 4515 रुपये प्रति क्विंटल, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीत आज 3210 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4625 ते किमान 2600 तर सरासरी 3600 रुपये प्रति क्विंटल, नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समितीत आज 2081 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4480 ते किमान 3500 तर सरासरी 4200 रुपये प्रति क्विंटल, अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर बाजार समितीत आज 2000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4570 ते किमान 4325 तर सरासरी 4485 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

खाद्यतेल आयातीला प्रोत्साहन

दरम्यान, सोयाबीन दरात घसरण (Soyabean Bajar Bhav) होत असताना, केंद्र सरकारकडून मात्र खाद्यतेल आयातीला प्रोत्साहन दिले जात आहे. दोनच दिवसांपूर्वी केंद्राकडून खाद्यतेल आयात शुल्कात केलेल्या कपातीला आणखी एका वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे पुढील वर्षभर देशात मोठ्या प्रमाणात स्वस्त खाद्यतेल आयात होऊन, देशातील तेलबिया बाजारावर याचा परिणाम दिसू शकतो. एकीकडे सोयाबीन दर घसरत असताना त्याला टेकू देण्याऐवजी सरकारकडून खाद्यतेल आयातीला प्रोत्साहन दिले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारच्या आठमुठ्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

error: Content is protected !!