Soyabean Bajar Bhav : सोयाबीनला हमीभावापेक्षा 1600 रुपये कमी भाव; वाचा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सोयाबीन (Soyabean Bajar Bhav) उत्पादक राज्य आहे. मात्र, यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीमुळे मोठ्या संतापाला सामोरे जावे लागले. अशातच आज चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा बाजार समितीत आज सोयाबीनला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. जो आतापर्यंतचा हंगामातील सर्वात कमी दर मानला गेला आहे. अर्थात केंद्र सरकारने २०२३-२४ च्या हंगामासाठी सोयाबीनसाठी घोषित केलेल्या हमीभावापेक्षा सध्या सोयाबीनला 1600 रुपये प्रति क्विंटल इतका कमी दर (Soyabean Bajar Bhav) मिळत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये सध्या शेतकऱ्यांना सोयाबीनचा उत्पादन खर्चही मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहे.

कुठे मिळतोय हमीभाव? (Soyabean Bajar Bhav Today 18 March 2024)

औसा (लातूर) बाजार समितीत आज सोयाबीनला राज्यात सर्वाधिक कमाल 4631 रुपये ते किमान 4211 रुपये तर सरासरी 4569 रुपये प्रति क्विंटल (Soyabean Bajar Bhav), उमरखेड (यवतमाळ) बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4600 रुपये ते किमान 4500 रुपये तर सरासरी 4550 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. या दोन बाजार समित्या वगळता अन्य बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनला हमीभावा इतका दर मिळत नाहीये.

आजचे सोयाबीन बाजारभाव

अमरावती बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4399 रुपये ते किमान 4150 रुपये तर सरासरी 4274 रुपये प्रति क्विंटल, कारंजा (वाशीम) बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4475 रुपये ते किमान 4050 रुपये तर सरासरी 4290 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4450 रुपये ते किमान 4100 रुपये तर सरासरी 4363 रुपये प्रति क्विंटल, मेहकर (बुलढाणा) बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4425 रुपये ते किमान 3800 रुपये तर सरासरी 4200 रुपये प्रति क्विंटल, जिंतूर (परभणी) बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4440 रुपये ते किमान 4211 रुपये तर सरासरी 4405 रुपये प्रति क्विंटल, वाशीम बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4425 रुपये ते किमान 4150 रुपये तर सरासरी 4200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

कधी मिळाला होता उच्चांकी भाव?

यापूर्वी 2021 मध्ये राज्यातील सोयाबीनचे दर 11 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचले होते. त्यानंतर आतापर्यंत दरात वाढ झालेली नाही. साधारणपणे 2022 पर्यंतच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत सोयाबीनचे चांगले होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून सोयाबीन दराने घेतलेली लोळवण अजूनही सुरूच असून, सध्या सोयाबीन दराची घसरण किमान ३००० हजार रुपयांपर्यंत झाली आहे. अर्थात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा ३००० हजाराहून अधिक असताना आता तीन हजार रुपये प्रति क्विंटलने सोयाबीन विक्री कसा करायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

error: Content is protected !!