Soyabean Bajar Bhav : ‘या’ बाजार समितीत सोयाबीनला 5 हजाराचा भाव! पहा आजचे बाजारभाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट नोंदवली (Soyabean Bajar Bhav) गेली आहे. मात्र मागील वर्षीची साठवून ठेवलेली सोयाबीन शेतकऱ्यांनी बाजारात आणल्याने आवक काहीशी वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून सोयाबीन दरात घट झाली असून, ते सरासरी 4500 ते 4800 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावल्याचे दिसून येत आहे. मात्र आज हिंगोली आणि बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा बाजार समितीत नेहमीपेक्षा कमी आवक राहिली. ज्यामुळे हिंगोली आणि सिंदखेड राजा बाजार समितीत (Soyabean Bajar Bhav) आज अनुक्रमे सर्वाधिक 5008 रुपये आणि 4900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

आजचे बाजार भाव (Soyabean Bajar Bhav 20 Dec 2023)

आज हिंगोली बाजार समितीत 660 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 5008 ते किमान 4650 रुपये तर सरासरी 4829 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा बाजार समितीत 434 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4900 ते किमान 4600 रुपये तर सरासरी 4750 रुपये प्रति क्विंटल, वाशीम बाजार समितीत 150 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4850 ते किमान 4550 रुपये तर सरासरी 4750 रुपये प्रति क्विंटल, वाशीम बाजार समितीत 150 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4850 ते किमान 4550 रुपये तर सरासरी 4750 रुपये प्रति क्विंटल, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर बाजार समितीत 2652 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4834 ते किमान 3800 रुपये तर सरासरी 4724 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

अकोला बाजार समितीत उच्चांकी 3598 क्विंटल सोयाबीनची आवक (Soyabean Bajar Bhav) झाली असून, कमाल 4800 ते किमान 4000 रुपये तर सरासरी 4645 रुपये प्रति क्विंटल, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर बाजार समितीत 275 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4800 ते किमान 4800 रुपये तर सरासरी 4800 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत 71 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4750 ते किमान 4500 रुपये तर सरासरी 4660 रुपये प्रति क्विंटल, बीड बाजार समितीत 10 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4751 ते किमान 4700 रुपये तर सरासरी 4726 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

error: Content is protected !!