सोयाबीच्या दराची घसरगुंडी, केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील दोन आठवड्यामध्ये सोयाबीनच्या दरात मोठी चढ -उतार झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत सोयाबीनचे दर हे स्थिर होते. त्यामुळे भविष्यात दर वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यामुळे शेतकरी अद्यापही सोयाबीनची साठवणूक करून आहेत. मात्र आता बाजारपेठेमध्ये आवक जास्त आणि दर कमी असतानाच केंद्र सरकारने वायदा बंदीचा मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे सोयाबीनचा दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची

दिवाळीनंतर सोयाबीनचा दर दोन हजारांनी वाढला होता. आता वायदे बंद होऊन जर आवक वाढली तर मात्र त्याचा सोयाबीनच्या दरावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची आवक मर्यादित ठेवून दर कायम ठेवावे लागणार आहेत. तर दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी आतापर्यंत साठवणूक केली होती पण आता आहे ते दर कायम रहावे याकरिता टप्प्याटप्प्याने सोयाबीनच्या विक्रीची गरज आहे.

सोयाबीनचे भाव घसरले

आजचा सोयाबीन बाजार भाव बघता असे दिसून येत आहे की काल जिथं मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सर्वाधिक 7001 चा भाव मिळाला होता तिथे भाव घसरून थेट 6005 इतका झाला आहे. इतर बाजार समित्यांचा विचार करता तेथे देखील भाव मागील आठवडा पेक्षा घसरलेला दिसून येत आहे. सोयाबीनची मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन ला आज कमाल भाव केवळ सहा हजार इतका मिळाला आहे. तर चांगला दर मिळतो अशी ख्याती असलेल्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज सोयाबीन ला कमाल भाव केवळ 5700 इतका मिळाला आहे. घसरणाऱ्या भावामुळे शेतकरी राजा मात्र चिंतेत आहे. साठवून ठेवलेल्या सोयाबीनचा करायचं काय असा सवाल शेतकऱ्यांच्या पुढे उपस्थित होऊ लागला आहे.

आजचा 21-12-21सोयाबीन बाजारभाव

शेतमाल– जात/प्रत– परिमाण आवक– कमीत कमी दर– जास्तीत जास्त दर– सर्वसाधारण दर
21/12/2021

अहमदनगर — क्विंटल 67 5500, 6400, 5950
माजलगाव — क्विंटल 314 4800, 5900, 5800
राहूरी -वांबोरी — क्विंटल 53 3801, 5800, 4800
सिल्लोड — क्विंटल 26 5800, 6000, 5900
कारंजा — क्विंटल 2600 5425, 6070, 5750
परळी-वैजनाथ — क्विंटल 400 5710, 6046, 5901
राहता — क्विंटल 30 5700, 6000, 5900
सोलापूर लोकल क्विंटल 62 4800, 5880, 5740
नागपूर लोकल क्विंटल 696 4700, 6132, 5774
हिंगोली लोकल क्विंटल 500 5500, 6000, 5750
मेहकर लोकल क्विंटल 890 5400, 6005, 5800
लातूर -मुरुड पिवळा क्विंटल 125 5900, 6050 ,6000
अकोला पिवळा क्विंटल 1902 5000, 6250 ,5700
मालेगाव पिवळा क्विंटल 28 2499, 5777, 4299
चोपडा पिवळा क्विंटल 20 5300, 6082, 5891
चिखली पिवळा क्विंटल 624 5800, 6470, 6135
बीड पिवळा क्विंटल 19 5401, 5801, 5698
पैठण पिवळा क्विंटल 4 5700, 5700, 5700
भोकरदन -पिपळगाव रेणू पिवळा क्विंटल 22 6100, 6250, 6200
भोकर पिवळा क्विंटल 103 4002, 5950, 4976
जिंतूर पिवळा क्विंटल 8 5401, 5401, 5401
मुर्तीजापूर पिवळा क्विंटल 750 5650, 6450, 5960
सावनेर पिवळा क्विंटल 16 5625, 5901, 5800
परतूर पिवळा क्विंटल 46 5656, 6010, 5966
गंगाखेड पिवळा क्विंटल 22 5900, 6150, 5900
तेल्हारा पिवळा क्विंटल 200 5575, 5800, 5690
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 12 5500, 5926, 5600
नांदगाव पिवळा क्विंटल 13 4200, 6099, 5851
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 150 5281 ,6075, 5900
पुर्णा पिवळा क्विंटल 79 5776, 6030, 6000
पांढरकवडा पिवळा क्विंटल 9 5825, 5825, 5825

Leave a Comment

error: Content is protected !!