हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन दरात पडझड सुरूच असून, आज राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात (Soyabean Bajar Bhav) 50 ते 125 रुपये प्रति क्विंटलने घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. अकोला बाजार समितीमध्ये आज सोयाबीन दरात कमाल 4675 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी (ता.20) अकोला बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल 4800 रुपये इतका दर मिळत होता. हंगामाच्या सुरुवातीपासूनच दर घसरणीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आणखी किती दिवस सोयाबीन घरात (Soyabean Bajar Bhav) ठेवायचे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहे.
आजचे बाजारभाव (Soyabean Bajar Bhav 22 Dec 2023)
राज्यातील प्रमुख सोयाबीन बाजार समितीत असलेल्या, अकोला बाजार समितीत आज 2344 क्विंटल आवक (Soyabean Bajar Bhav) झाली असून, सोयाबीनला आज त्या ठिकाणी कमाल 4675 ते किमान 4195 रुपये तर सरासरी 4625 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. सोलापूर बाजार समितीत आज सोयाबीनची 7 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4700 ते किमान 4700 रुपये तर सरासरी 4700 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज सोयाबीनची 4605 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4641 ते किमान 4500 रुपये तर सरासरी 4570 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत आज सोयाबीनची 495 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4614 ते किमान 4200 रुपये तर सरासरी 4511 रुपये प्रति क्विंटल, हिंगोली बाजार समितीत आज सोयाबीनची 600 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4751 ते किमान 4400 रुपये तर सरासरी 4575 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर बाजार समितीत (Soyabean Bajar Bhav) आज सोयाबीनची 2061 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4760 ते किमान 3640 रुपये तर सरासरी 4642 रुपये प्रति क्विंटल, बुलढाणा बाजार समितीत आज सोयाबीनची 200 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4600 ते किमान 4500 रुपये तर सरासरी 4550 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ बाजार समितीत आज सोयाबीनची 146 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4600 ते किमान 4200 रुपये तर सरासरी 4400 रुपये प्रति क्विंटल, जालना बाजार समितीत आज सोयाबीनची 146 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4750 ते किमान 4100 रुपये तर सरासरी 4600 रुपये प्रति क्विंटल, लातूर बाजार समितीत आज सोयाबीनची 8315 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4785 ते किमान 4643 रुपये तर सरासरी 4720 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
वर्षभरापासून दराची गटांगळी
गेल्या वर्षी ऑक्टोबरनंतर सोयाबीनचा दर (Soyabean Bajar Bhav) वाढला. साडेपाच हजारांवर आला; पण त्यानंतर दरात घसरण झाली. पाच हजारांच्या खाली भाव आला. यंदाही तशीच स्थिती आहे. कारण यावर्षीही सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले. मात्र, उत्पादन कमी होऊनही दर वाढलेले नाहीत. गेले काही महिने सोयाबीनचा क्विंटलचा भाव पाच हजारांच्या आतच आहे. त्यामुळे दर वाढीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना घरात साठवून ठेवलेल्या सोयाबीनचे आता काय करायचे, असा प्रश्न पडलेला आहे.