Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दर आणखी घसरणार? सरकारचे कारस्थान; पहा आजचे भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील सोयाबीन (Soyabean Bajar Bhav) उत्पादक शेतकऱ्यांचा पाय आणखी खोलात जाणार आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाने खाद्यतेल कंपन्यांना पत्र लिहून, स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती कमी करण्यास सांगितले आहे. देशातील खाद्यतेल व्यवसायातील शिखर संस्था असलेल्या सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने याबाबत माहिती समोर आणली आहे. त्यामुळे देशात स्वयंपाकाच्या तेलाच्या किमती कमी होणार असून, त्याचा थेट परिणाम सोयाबीनच्या दरावर (Soyabean Bajar Bhav) होणार आहे.

सोयाबीन दरावर येणार दबाव (Soyabean Bajar Bhav Today 24 Jan 2024)

दरम्यान, आज राज्यातील हिंगोली, लातूर, जळगाव, चोपडा, बीड, उमरखेड, कळंब या काही निवडक बाजार समित्यांमध्येच सोयाबीनला कमाल 4600 रुपये प्रति क्विंटल दर (Soyabean Bajar Bhav) मिळाला आहे. उर्वरित सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर कमाल 4400 ते 4500 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास रेंगाळताना दिसून आला. त्यामुळे आता खाद्यतेल उत्पादक कंपन्यांनी स्वयंपाकाच्या तेलाच्या दरात कपात केल्यास सोयाबीन दरावर आणखी दबाव येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी आता सोयाबीनसह तेलबियांचे दर पाडण्याचे काम सरकारकडून सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.

आज सर्वाधिक दर मिळालेल्या बाजार समित्या

लातूर बाजार समितीत आज सोयाबीनची 16976 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी राज्यातील आजचा सर्वाधिक कमाल 4699 ते किमान 4550 तर सरासरी 4620 रुपये प्रति दर, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड बाजार समितीत आज सोयाबीनची 120 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4650 ते किमान 4600 तर सरासरी 4620 रुपये प्रति दर, यवतमाळ जिल्ह्यातील कळंब बाजार समितीत आज सोयाबीनची 60 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4650 ते किमान 4350 तर सरासरी 4500 रुपये प्रति दर, हिंगोली बाजार समितीत आज सोयाबीनची 600 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4640 ते किमान 4235 तर सरासरी 4437 रुपये प्रति दर, चोपडा बाजार समितीत आज सोयाबीनची 100 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4651 ते किमान 4300 तर सरासरी 4500 रुपये प्रति दर, जळगाव बाजार समितीत आज सोयाबीनची 187 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4645 ते किमान 4450 तर सरासरी 4645 रुपये प्रति दर, बीड बाजार समितीत आज सोयाबीनची 128 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4600 ते किमान 4531 तर सरासरी 4567 रुपये प्रति दर मिळाला आहे.

अशाच पद्धतीने रोजचे सोयाबीनचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता. दरम्यान, आज अमरावती, कारंजा, तुळजापूर, नागपूर, वाशीम, जिंतूर, मुरुम, चिमूर या बाजार समित्यांमध्ये कमाल 4500 रुपये क्विंटलच्या आसपास दर मिळाला आहे. तर उर्वरित सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा दर प्रति क्विंटल कमाल 4400 रुपयांची नोंदवला गेला आहे.

error: Content is protected !!