Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरात पुन्हा घसरण; पहा आजचे बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली असून, सोयाबीनचा बाजार भाव (Soyabean Bajar Bhav) मात्र सरासरी 4400 ते 4800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान गेल्या आठवड्यापासून राज्यातील हिंगोली बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल 5 हजारांचा दर (Soyabean Bajar Bhav) कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. हिंगोली वगळता इतर बाजार समित्यांमध्ये दरातील अल्प सुधारणेनंतर आज पुन्हा घसरण झाली आहे.

आजचे सोयाबीन बाजार भाव (Soyabean Bajar Bhav Today 30 Dec 2023)

आज हिंगोली येथील बाजार समितीत सोयाबीनची (Soyabean Bajar Bhav) 900 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 5001 ते किमान 4600 रुपये तर सरासरी 4800 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. सातारा जिल्ह्यातील वडूज बाजार समितीत आज 20 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4900 ते किमान 4700 रुपये तर सरासरी 4800 रुपये प्रति क्विंटल, अमरावती बाजार समितीत आज सर्वाधिक 4041 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4679 ते किमान 4550 रुपये तर सरासरी 4614 रुपये प्रति क्विंटल, वाशीम बाजार समितीत आज 3000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4630 ते किमान 4300 रुपये तर सरासरी 4550 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत आज 2551 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4670 ते किमान 4200 रुपये तर सरासरी 4635 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीने रोजचे विविध पिकांचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील तुमच्या पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर बाजार समितीत आज 225 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4675 ते किमान 4675 रुपये तर सरासरी 4675 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत आज 560 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4556 ते किमान 4200 रुपये तर सरासरी 4467 रुपये प्रति क्विंटल, अमरावती जिल्ह्यातील चिखली बाजार समितीत आज 1148 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4741 ते किमान 4380 रुपये तर सरासरी 4560 रुपये प्रति क्विंटल, अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर बाजार समितीत आज 750 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4670 ते किमान 4490 रुपये तर सरासरी 4560 रुपये प्रति क्विंटल, परभणी जिल्ह्यातील सेलू बाजार समितीत आज 314 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, त्या ठिकाणी कमाल 4640 ते किमान 4200 रुपये तर सरासरी 4550 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

सोयाबीनच्या आवकेत वाढ

सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचा साठा करुन ठेवला होता. मात्र दर (Soyabean Bajar Bhav) घसरल्याने शेतकऱ्यांची सातत्याने निराशा होत आहे. त्यामुळे आणखी दर घसरणीच्या भीतीने शेतकरी सध्या साठवलेली सोयाबीन आणत असून, बाजारात सोयाबीनच्या आवकेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र यावर्षी दुष्काळी संकटासोबतच योग्य दर मिळत नसल्याने सोयाबीनचा उत्पादन खर्चही मिळत नसल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे.

error: Content is protected !!