हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने 2023-24 च्या खरीप हंगामासाठी सोयाबीनला (Soyabean Bajar Bhav) 4600 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, आज परभणी जिल्ह्यातील गंगाखेड बाजार समिती वगळता राज्यातील एकाही बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळू शकलेला नाही. गंगाखेड बाजार समितीत आज 25 क्विंटल आवक झाली असून, त्या ठिकाणी आज राज्यातील सर्वाधिक कमाल 4700 ते किमान 4650 तर सरासरी 4650 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. परिणामी, हमीभाव देखील मिळत नसल्याने सोयाबीन (Soyabean Bajar Bhav) उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सरकारविषयी रोष पाहायला मिळत आहे.
सर्वाधिक दर मिळालेले मार्केट (Soyabean Bajar Bhav Today 5 Feb 2024)
हिंगोली बाजार समितीत आज 500 क्विंटल आवक (Soyabean Bajar Bhav) झाली असून, कमाल 4550 ते किमान 4105 तर सरासरी 4327 रुपये प्रति क्विंटल, लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी बाजार समितीत आज 369 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4505 ते किमान 4471 तर सरासरी 4488 रुपये प्रति क्विंटल, परभणी जिल्ह्यातील पालम व सोलापूर बाजार समितीत आज एकत्रितपणे कमाल 4500 ते किमान 4500 तर सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल, परभणी जिल्ह्यातील सोनपेठ बाजार समितीत आज 25 क्विंटल आवक झाली असून, 4471 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
अमरावती जिल्ह्यातील चिखली बाजार समितीत आज 810 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4400 ते किमान 4100 तर सरासरी 4250 रुपये प्रति क्विंटल, परभणी जिल्ह्यातील सेलू बाजार समितीत आज 1000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4400 ते किमान 3800 तर सरासरी 3850 रुपये प्रति क्विंटल, वाशिम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत आज 2500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4455 ते किमान 4100 तर सरासरी 4350 रुपये प्रति क्विंटल, तुळजापूर बाजार समितीत आज 60 क्विंटल आवक झाली असून, 4460 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
कमी दर मिळालेले मार्केट
छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत (Soyabean Bajar Bhav) आज 21 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4251 ते किमान 3800 तर सरासरी 4026 रुपये प्रति क्विंटल, मालेगाव (वाशिम) बाजार समितीत आज 450 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4365 ते किमान 4100 तर सरासरी 4200 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत आज 399 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4200 ते किमान 4100 तर सरासरी 4175 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ बाजार समितीत आज 309 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4380 ते किमान 4080 तर सरासरी 4230 रुपये प्रति क्विंटल, बीड जिल्हयातील गेवराई बाजार समितीत आज 22 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4350 ते किमान 4345 तर सरासरी 4350 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
अशाच पद्धतीने रोजचे सोयाबीनचे बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता.
हमीभावातील वाढ गाजावाजा पुरतीच
दरम्यान, परभणीतील गंगाखेड वगळता राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनला सरासरी 4000 ते 4300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीनला सरासरी 4400 ते 4600 रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. परिणामी, दिवसेंदिवस सोयाबीनचे भाव घसरत चालले असल्यामुळे शेतकऱ्यांना धीर सुटत चालला आहे. यावर्षी केंद्राने दिमाखात सोयाबीनच्या हमीभावात प्रति क्विंटलमागे 300 रुपयांची वाढ केली खरी. मात्र ती गाजावाजा करण्यापुरतीच मर्यादित राहिली असून, प्रत्यक्षात मात्र बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याचे चित्र आहे.