Soyabean Bajar Bhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी विवंचनेत; हंगाम सरला पण भावात सुधारणा नाहीच!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सोयाबीन उत्पादक (Soyabean Bajar Bhav) शेतकऱ्यांमागील शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाहीये. यावर्षीचा खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना बियाणे, खते यासाठी आर्थिक तजवीज करावी लागणार आहे. मात्र, असे असूनही गेल्या सहा महिन्यापासून हमीभावापेक्षा कमी असलेले सोयाबीन दर (Soyabean Bajar Bhav) सुधारण्याचे नाव घेत नाहीये.

गेल्या वर्षी खरिपात सुरुवातीपासूनच सोयाबीन दर कमी असल्याने, शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने योग्य भाव मिळेल, यासाठी सोयाबीन घरात साठवून ठेवली होती. मात्र, आता नवीन पेरणी हंगाम दोन महिन्यांवर आला आहे. तरी सोयाबीनचे दर (Soyabean Bajar Bhav) हमीभावापेक्षा कमी असलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडले आहेत.

निवडक बाजार समित्यांमध्ये हमीभाव (Soyabean Bajar Bhav Today 6 April 2024)

महाराष्ट्र हे देशातील क्रमांक दोनचे सर्वाधिक सोयाबीन उत्पादन करणारे राज्य आहे. मात्र, आज राज्यातील उदगीर, कारंजा, आंबेजोगाई, निलंगा, सिंदखेड राजा या निवडक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा कमाल दर (Soyabean Bajar Bhav) हमीभावापेक्षा अधिक असल्याचे पाहायला मिळाले. केंद्र सरकारने 2023-24 च्या खरीप हंगामासाठी सोयाबीन पिकासाठी 4600 रुपये प्रति क्विंटल हमीभाव निर्धारीत केला होता.

आजचे राज्यातील दर

सिंदखेड राजा बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4630 ते किमान 4600 रुपये तर सरासरी 4615 रुपये (Soyabean Bajar Bhav) प्रति क्विंटल, आंबेजोगाई बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4629 ते किमान 4430 रुपये तर सरासरी 4629 रुपये प्रति क्विंटल, उदगीर बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4611 ते किमान 4573 रुपये तर सरासरी 4592 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

कारंजा बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4610 ते किमान 4175 रुपये तर सरासरी 4425 रुपये प्रति क्विंटल, निलंगा बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4610 ते किमान 4450 रुपये तर सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. तर उर्वरित सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला किमान 4000 रुपये तर सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळत आहे.

error: Content is protected !!