Soyabean Bajar Bhav : सोयाबीनला 4989 रुपये दर; पहा… आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीन दरात (Soyabean Bajar Bhav) मोठी घसरण झाली आहे. हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आहे. अशातच आता बीड जिल्ह्यातील गेवराई बाजार समितीत आज सोयाबीन दराने कमाल 4989 रुपये प्रति क्विंटलपर्यंत मजल मारली आहे. आज गेवराई बाजार समितीत 9 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4989 ते किमान 4389 तर सरासरी 4389 रुपये प्रति क्विंटल दर सोयाबीनला (Soyabean Bajar Bhav) मिळाला आहे.

‘या’ ठिकाणी मिळतोय हमीभाव? (Soyabean Bajar Bhav Today 7 Feb 2024)

बार्शी – टाकळी (अकोला) बाजार समितीत सोयाबीनची 131 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4900 ते किमान 4700 तर सरासरी 4800 रुपये प्रति क्विंटल दर (Soyabean Bajar Bhav) मिळाला आहे. तासगाव (सांगली) बाजार समितीत 25 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4930 ते किमान 4850 तर सरासरी 4890 रुपये, पिंपळगाव(ब) – पालखेड बाजार समितीत 307 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4602 ते किमान 4401 तर सरासरी 4560 रुपये, सिंदखेड राजा (बुलढाणा) बाजार समितीत 325 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4650 ते किमान 4600 तर सरासरी 4615 रुपये, उमरखेड-डांकी (यवतमाळ) बाजार समितीत 120 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4650 ते किमान 4600 तर सरासरी 4620 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. वरील बाजार समित्या वगळता आज राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा (४६०० रुपये) कमीच असल्याचे पाहायला मिळाले.

सर्वाधिक दर कुठे?

आंबेजोबाई (बीड) बाजार समितीत 190 क्विंटल आवक झाली असून, 4575 रुपये प्रति क्विंटल दर (Soyabean Bajar Bhav) मिळाला आहे. काटोल (नागपूर) बाजार समितीत 50 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4541 ते किमान 4150 तर सरासरी 4350 रुपये, परतूर (जालना) बाजार समितीत 73 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4500 ते किमान 4400 तर सरासरी 4450 रुपये, हिंगणघाट (वर्धा) बाजार समितीत 2794 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4565 ते किमान 3800 तर सरासरी 4450 रुपये, हिंगोली बाजार समितीत 605 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4580 ते किमान 4150 तर सरासरी 4365 रुपये, नागपूर बाजार समितीत 880 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4510 ते किमान 4200 तर सरासरी 4433 रुपये, तुळजापूर (सोलापूर) बाजार समितीत 80 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4525 ते किमान 4525 तर सरासरी 4525 रुपये, कारंजा (वाशीम) बाजार समितीत 2500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4500 ते किमान 4125 तर सरासरी 4375 रुपये दर मिळाला आहे.

दरम्यान, आज काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात अल्प सुधारणा दिसून आल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र उत्पादन खर्च आणि यंदाचे पावसाचे प्रमाण पाहता शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोल मिळत नसल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहे. आवक कमी झाल्याने, काही बाजार समित्यांमध्ये मुख्यतः ही वाढ दिसून आली आहे. त्यामुळे आता ही वाढ कायम राहणार का? पुन्हा कमी होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

error: Content is protected !!