Soyabean Bajar Bhav : सोयाबीन दरात पुन्हा घसरण; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीन दरात (Soyabean Bajar Bhav) आज पुन्हा घसरण पाहायला मिळाली आहे. शेतकऱ्यांनी दरवाढ होईल, या आशेने सोयाबीन घरात साठवून ठेवले होते. मात्र त्यांची निराशा झाली असून, आज सोयाबीन दर सरासरी 4400 ते 4600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले आहेत. दरम्यान आज चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर बाजार समितीत सोयाबीनला सर्वाधिक कमाल 5000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. चिमूर बाजार समिती वगळता अन्य बाजार समित्यांमध्ये मात्र सोयाबीनचे दर (Soyabean Bajar Bhav) घसरलेले आहेत.

राज्यातील आजचे बाजारभाव (Soyabean Bajar Bhav Today 8 Jan 2024)

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर बाजार समितीत आज 70 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 5000 ते किमान 4900 रुपये तर सरासरी 4950 रुपये प्रति क्विंटल दर (Soyabean Bajar Bhav) मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी बाजार समितीत आज 153 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4800 ते किमान 4680 रुपये तर सरासरी 4720 रुपये प्रति क्विंटल, नांदेड जिल्ह्यातील मुखेड बाजार समितीत आज 25 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4800 ते किमान 4650 रुपये तर सरासरी 4800 रुपये प्रति क्विंटल, अमरावती जिल्ह्यातील चिखली बाजार समितीत आज 900 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4751 ते किमान 4300 रुपये तर सरासरी 4525 रुपये प्रति क्विंटल, बीड बाजार समितीत आज 73 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4701 ते किमान 4600 रुपये तर सरासरी 4647 रुपये प्रति क्विंटल, बीड जिल्ह्यातील आंबेजोबाई बाजार समितीत आज 260 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4700 ते किमान 4640 रुपये तर सरासरी 4650 रुपये प्रति क्विंटल रुपये दर मिळाला आहे.

शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीने रोजचे सोयाबीन बाजारभाव वाचण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi अँप डाउनलोड करा. यामध्ये तुम्ही तुमच्या बाजार समितीतील सर्व पिकाचे रोजचे बाजारभाव पाहू शकता. वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत आज 4000 क्विंटल सोयाबीनची (Soyabean Bajar Bhav) आवक झाली असून, कमाल 4670 ते किमान 4450 रुपये तर सरासरी 4590 रुपये प्रति क्विंटल, अकोला बाजार समितीत आज 2622 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4675 ते किमान 4295 रुपये तर सरासरी 4600 रुपये प्रति क्विंटल, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर बाजार समितीत आज 2907 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4675 ते किमान 3500 रुपये तर सरासरी 4586 रुपये प्रति क्विंटल, वाशीम बाजार समितीत आज 3000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4625 ते किमान 4475 रुपये तर सरासरी 4550 रुपये प्रति क्विंटल, हिंगोली बाजार समितीत आज 274 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4600 ते किमान 4500 रुपये तर सरासरी 4550 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज 47 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4533 ते किमान 4350 रुपये तर सरासरी 4428 रुपये प्रति क्विंटल, यवतमाळ बाजार समितीत आज 659 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून, कमाल 4620 ते किमान 4400 रुपये तर सरासरी 4510 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

दराला उतरती कळा

गेल्या आठवड्यात असणारा सोयाबीनचा सरासरी (Soyabean Bajar Bhav) 4400 ते 4800 रुपये दर या आठवड्यात 4400 ते 4600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे आता दिवसेंदिवस सोयाबीनच्या दराला उतरती कळा लागली आहे. परिणामी नगदी पीक असणारे सोयाबीनची लागवड करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे. जवळपास दीड दोन वर्षांपूर्वी 11 हजार रुपये क्विंटल असणारा सोयाबीनचा दर, मागील हंगामापासून पाच हजाराच्या आसपास रेंगाळताना दिसत आहे.

error: Content is protected !!