Soyabean Bajar Bhav : सोयाबीनला 5000 रुपये भाव; पहा… आजचे राज्यातील बाजारभाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या सोयाबीनच्या दरात (Soyabean Bajar Bhav) मोठी घसरण पाहायला मिळतिये. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तसेच छत्रपती संभाजीनगर, वाशीम या चार बाजार समित्या वगळता राज्यातील अन्य बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभाव देखील मिळत नाहीये. अशातच आज (ता.9) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर व मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत सोयाबीनला राज्यातील सर्वाधिक कमाल 5000 रुपये दर मिळाला आहे. प्रामुख्याने या दोन्ही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक घटल्याने दरात (Soyabean Bajar Bhav) ही वाढ झाली असल्याचे सांगितले जात आहे.

‘या’ ठिकाणी मिळतोय हमीभाव? (Soyabean Bajar Bhav Today 9 Feb 2024)

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर बाजार समितीत आज 60 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5000 ते किमान 4900 रुपये तर सरासरी 4950 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आज 14 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5000 ते किमान 4300 रुपये तर सरासरी 4650 रूपये, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड बाजार समितीत आज 240 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4650 ते किमान 4600 रुपये तर सरासरी 4620 रूपये, वाशीम बाजार समितीत आज 300 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4600 ते किमान 4350 रुपये तर सरासरी 4500 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

सर्वाधिक दर कुठे?

तुळजापूर (धाराशिव) बाजार समितीत आज 100 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4551 ते किमान 4551 रुपये तर सरासरी 4551 रूपये प्रति क्विंटल दर (Soyabean Bajar Bhav) मिळाला आहे. पालम (परभणी) बाजार समितीत आज 101 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4550 ते किमान 4550 रुपये तर सरासरी 4550 रूपये, नांदगाव (नाशिक) बाजार समितीत आज 11 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4540 ते किमान 4487 रुपये तर सरासरी 4520 रूपये, सोलापूर बाजार समितीत आज 30 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4525 ते किमान 4505 रुपये तर सरासरी 4510 रूपये, कारंजा (वाशीम) बाजार समितीत आज 3500 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4510 ते किमान 4150 रुपये तर सरासरी 4390 रूपये, सेलू (परभणी) बाजार समितीत आज 490 क्विंटल आवक झाली असून, कमाल 4500 ते किमान 3950 रुपये तर सरासरी 4420 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.

आवक घटल्याने दरवाढ

याशिवाय आज अमरावती, अकोला, नागपूर, यवतमाळ, हिंगोली या महत्वाच्या अन्य बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ४३०० ते ४४०० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास दर मिळाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तसेच छत्रपती संभाजीनगर, वाशीम या ठिकाणी सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. मात्र, दरातील ही वाढ त्या ठिकाणी आवक घटल्याने झाली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता ही वाढ पुढील किती दिवस टिकून राहणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

error: Content is protected !!