हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात राज्यातील सोयाबीनच्या दरात घसरण (Soyabean Bajar Bhav) काहीशी पाहायला मिळाली होती. गेल्या हंगामातील सोयाबीन शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून भाव वाढेल, या आशेने साठवणूक करून ठेवले होते. मात्र हंगामाच्या सुरुवातीपासूनच 5000 रुपये प्रति क्विंटलच्या (Soyabean Bajar Bhav) आसपास दर रेंगाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच मागील मागील आठवड्यात सोयाबीनच्या दरात 300 रुपये प्रति क्विंटलची घसरण नोंदवली गेली. मात्र सध्या राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर 4800 रुपये प्रति क्विंटलच्या (Soyabean Bajar Bhav) आसपास स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.
आजचे सोयाबीन बाजारभाव (Soyabean Bajar Bhav Today In Maharashtra)
राज्यातील काही बाजार समित्यांमधील सोयाबीनचे आजचे बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत. वाशीम बाजार समितीत आज सोयाबीनला कमाल 4850 ते किमान 4725 रुपये तर सरासरी 4750 रुपये प्रति क्विंटल, नागपूर बाजार समितीत सोयाबीनला कमाल 4850 ते किमान 4300 रुपये तर सरासरी 4712 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत सोयाबीनला कमाल 4751 ते किमान 4751 रुपये तर सरासरी 4751 रुपये प्रति क्विंटल, जालना जिल्ह्यातील परतूर बाजार समितीत सोयाबीनला कमाल 4850 ते किमान 4795 रुपये तर सरासरी 4800 रुपये प्रति क्विंटल, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत सोयाबीनला कमाल 4703 ते किमान 4703 रुपये तर सरासरी 4703 रुपये प्रति क्विंटल, बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समितीत सोयाबीनला कमाल 4703 ते किमान 4703 रुपये तर सरासरी 4703 रुपये प्रति क्विंटल, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर बाजार समितीत सोयाबीनला कमाल 4852 ते किमान 4200 रुपये तर सरासरी 4797 रुपये प्रति क्विंटल तर उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा बाजार समितीत सोयाबीनला कमाल 4800 ते किमान 4750 रुपये तर सरासरी 4760 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर
यावर्षी राज्याच्या बहुतांश भागात पाऊस कमी होता. यामुळे शेतकऱ्यांच्या एकरी सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यातच सध्या सोयाबीनला प्रति क्विंटलला 4 हजार 800 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. शेतकरी दरवाढीची अपेक्षा करत आहेत. सोयाबीनच्या दरांमध्ये यावर्षीच्या हंगामामध्ये सातत्याने घसरण झाली असल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. तर दर घसल्यामुळे शेतकरी सोयाबीन विक्रीकडे पाठ फिरवत असल्याचे घटलेल्या आवकेवरून दिसून येत आहे.