Soyabean Crop : सोयाबीनला पिवळे सोने का म्हणतात? वाचा… नेमकं काय आहे कारण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सोयाबीन देशातील खरीप हंगामात घेतले जाणारे प्रमुख पीक (Soyabean Crop) आहे. रोजच्या अनेक वस्तूंमध्ये सोयाबीनचा उपयोग आढळतो. सोयाबीन तेल तर रोजच्या आहारात खाद्यतेल म्हणून अग्रक्रमाने वापरले जाते. याशिवाय सोयाबीनच्या वड्या ज्या भाजीसाठी वापरल्या जातात. सोयाबीनपासून दूध तयार होते. ज्याला सोया मिल्क म्हटले जाते. सोया पनीर देखील रोजच्या वापरात आढळून येते. असा मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा वापर होत असल्याने, महाराष्ट्रासह देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादन घेतात. त्यामुळे नेमके सोयाबीन पिकाला (Soyabean Crop) पिवळे सोने का म्हटले जाते? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल? आज आपण याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहे.

का म्हणतात पिवळे सोने? (Soyabean Crop Called Yellow Gold)

शेतकऱ्यांच्या सोयाबीनला पिकाला (Soyabean Crop) ‘पिवळे सोने’ म्हणण्यामागे प्रामुख्याने दोन धागे आहेत. एक म्हणजे सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे आणि पोषक घटक असतात. ज्यामुळे त्यास पिवळे सोने म्हटले जाते. याशिवाय सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आढळतात. ज्यामुळे शरीराची आवश्यक अमीनो आम्लाची गरज पूर्ण होते. अर्थात पोषणमूल्यांचा दृष्टीने परिपूर्ण असल्याने सोयाबीनला ‘पिवळे सोने’ म्हणतात.

तर दुसरा धागा म्हणजे शेतकरी पीक काढणीनंतर सोयाबीनची घरात सोन्याप्रमाणे साठवणूक करून ठेऊ शकतात. त्यानंतर भाववाढ झाल्यानंतर विक्री करू शकतात. अर्थात सोन्याप्रमाणे सोयाबीनला दर मिळण्याचे गणित असल्याने तिला शेतकऱ्यांचे ‘पिवळे सोने’ म्हणतात. मात्र, शेतकऱ्यांच्या या पिवळ्या सोन्याला गेल्या काही दिवसांपासून कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे हे पिवळे सोने मातीमोल दरात विकले जात आहे. याला सरकारचे बेसुमार खाद्यतेल आयात धोरण जबाबारदार आहे.

सोयाबीनचे पाच मोठे फायदे?

  • सोयाबीनच्या गुणवैशिष्ट्यांमुळे जगराभरात मोठ्या प्रमाणात खाद्यपर्थांमध्ये सोयाबीनचा वापर पाहायला मिळतो.
  • सोयाबीनमध्ये उच्च गुणवत्तेचे प्रथिने 50 टक्के तर त्याशिवाय अमीनो आम्ल, फॅट, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी एसिड मोठ्या प्रमाणात आढळते.
  • सोयाबीनमध्ये अन्य अन्नद्यान्य व तेलबियांच्या तुलनेत अधिक प्रमाणात व्हिट्यामिन, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक तत्व आढळतात.
  • सोयाबीनपासून बनलेली उत्पादने जसे की सोया मिल्क, सोया नट्स, स्प्राउट्स आणि सोया सॉस यांचा रोजच्या आहारात समावेश केल्याने मधुमेह, हृदयरोग, हार्ट अटॅक आणि कॅन्सरसारख्या रोगांच्या रुग्णांना आरोग्यासाठी मोठी मदत होते.
  • सध्याच्या बैठे कामाच्या जीवनशैलीमुळे अनेकांना लठ्ठपणाला सामोरे जावे लागते. याच लठ्ठपणामुळे अनेक आजार जडतात. मात्र, सोयाबीनचा नियमित आहारात समावेश केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

error: Content is protected !!