Soyabean Farmers : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 रुपये मिळणार; कृषिमंत्र्यांची माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील संपूर्ण वर्ष सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Soyabean Farmers) निराशेचे राहिले आहे. अर्थात गेल्या काही महिन्यांपासून तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. ज्यामुळे सध्या ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात सोयाबीन दराचा मुद्दा ऐरणीवर आला असून, सत्ताधारी भाजपची यामुळे चांगलीच गोची झाली आहे. अशातच आता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सोयाबीन उत्पादक (Soyabean Farmers) शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. ते भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे.

हेक्टरी 5 हजार रुपये मिळणार (Soyabean Farmers 5 Thousand Per Hectare)

दरम्यान, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Soyabean Farmers) हेक्टरी 5 हजार रुपये मिळणार घोषणा करतानाच, येत्या 12 जूनपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे. अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली आहे. प्रामुख्याने खरीपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडे चार हजार कोटी रुपयांचे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5 हजार रुपये देण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडेंनी यावेळी सांगितले आहे.

कापूस मदतीची घोषणा लवकरच

इतकेच नाही तर राज्यातील शेतकऱ्यांना कापूस पिकासाठीची आर्थिक मदत देण्याबाबत अजून स्पष्टता नाही. कापूस पिकाची मदत क्विंटलवर द्यायची की हेक्टरवर द्यायची हे अजून निश्चित झालेले नाही. त्यामुळे, तेही लवकरच ठरवले जाऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही लाभ मिळवून देण्यात येणार आहे. कापूस उत्पादकांना दिली जाणार ही आर्थिक मदत देखील 12 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली आहे.

विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, भर प्रचारसभेत आचारसंहिता काळात राज्याच्या कृषिमंत्र्यांनी ही मोठी आर्थिक घोषणा केल्याने, विरोधी पक्षातील नेते काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण मदतीच्या घोषणेनंतर, आर्थिक मदतीच्या वितरणाची तारीखही जाहीर केली आहे. निवडणूक काळात आचारसंहिता असल्याने कुठलीही मोठी घोषणा करता येत नाही, किंवा मतदारांना आमिष दाखवून मत वळवण्याचा प्रयत्न करण्यात येत नाही. त्यामुळे विरोधी पक्षांना हे आयतेच कोलीत सापडणार आहे.

error: Content is protected !!