Soyabean Import : सोयाबीन आयातीत घट होण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी (2023-24) विदेशातून होणाऱ्या सोयाबीन आयातीत (Soyabean Import) घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर्षी देशात 5 लाख टन इतकी सोयाबीन आयात (Soyabean Import) केली जाऊ शकते. जी मागील वर्षी 2022-23 मध्ये 7.03 लाख टन इतकी नोंदवली गेली होती. अर्थात सोयाबीन आयातीत यावर्षी 2 लाख टनांनी घट होणार आहे. असे सोयाबीन प्रोसेसर्स एसोसिएशन ऑफ इंडिया (सोपा) या खाद्यतेल व्यवसायातील प्रमुख संघटनेने म्हटले आहे.

सोयाबीन प्रोसेसर्स एसोसिएशन ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार, ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या काळात देशातील खाद्येतल रिफायनरींच्या सोयाबीन आयातीत (Soyabean Import) तीन पटीने वाढ होऊन, ती 18.36 लाख टन इतकी नोंदवली गेली होती. तर 2021-22 मध्ये याच कालावधीत 6.44 लाख टन इतकी सोयाबीन आयात करण्यात आली होती. त्यामुळे ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या काळात मागील वर्षीच्या तुलनेत तीन पट्टींनी अधिक सोयाबीन आयात झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र आता त्यात 2 लाख टनांनी घट होणार असल्याचे सोपा या संघटनेने म्हटले आहे.

1.08 लाख टन साठा कमी (Soyabean Import In India)

सोयाबीन प्रोसेसर्स एसोसिएशन ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, यावर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये नवीन खाद्यतेल हंगाम सुरु झाला. तेव्हा देशात मागील वर्षीचा 24.07 लाख टन इतका सोयाबीन साठा रियनरींकडे शिल्लक होता. ऑक्टोबर 2022 मध्ये मागील वर्षी याच काळात हंगाम सुरु झाला तेव्हा 25.15 लाख टन सोयाबीन साठा शिल्लक होता. अर्थात यावर्षी खाद्यतेल रिफायनरींकडे 1.08 लाख टन सोयाबीन साठा कमी आहे.

पावसाअभावी उत्पादनात घट

त्याचप्रमाणे यंदा देशातील सोयाबीन उत्पादन मागील वर्षीच्या 124.11 लाख टनांवरून घसरून, 118.74 लाख टन इतके राहण्याचा अंदाज आहे. अर्थात 2023-24 या वर्षात सोयाबीनची देशातील एकूण उपलब्धता ही 142.81 लाख टन इतकी राहणार आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत नोंदवल्या गेलेल्या 149.26 लाख टन साठ्यापेक्षा कमी असणार आहे. असेही सोयाबीन प्रोसेसर्स एसोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे. देशातील सोयाबीन उत्पादनात घट होण्यास प्रमुख कारण, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानसह कर्नाटक, गुजरातमध्ये अनेक ठिकाणी पावसाअभावी सोयाबीन उत्पादनात घट होणार असल्याचे सोपाने म्हटले आहे.

error: Content is protected !!