Soyabean Rate : ‘या’ बाजार समितीत मिळाला सोयाबीनला हंगामातील उच्चांकी भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात (Soyabean Rate) काहीशी घसरण पाहायला मिळत होती. चालू हंगामात राज्यातील काही बाजार समित्यांमध्ये तर सोयाबीनचे दर 3 हजार 800 ते 4 हजार 100 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली घसरले होते. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला या हंगामातील 5 हजार 451 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. तर आज वाशीम बाजार समितीमध्ये सोयाबीनची 15 हजार क्विंटल इतकी आवक झाली.

सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी खुश – Soyabean Rate

राज्यात यावर्षी उशिरा दाखल झालेला मान्सून, ऑगस्ट महिन्यात मान्सूनमध्ये पडलेला खंड यामुळे यावर्षीचे सोयाबीन पीक कमालीचे धोक्यात आले. ऐन फुलोऱ्यात असताना पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांना एकरी उत्पादनात मोठा फटका बसला. त्याच काळात ‘येलो मोझॅक किडीचा’चा प्रादुर्भाव झाल्याने त्याचा सोयाबीनच्या गुणवत्तेवरही परिणाम होऊन दाण्यांची फुगवण कमी झाली. त्यातच हंगाम सुरू झाला आणि दर घसरले. या मिळणाऱ्या दरामध्ये शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळणेही कठिण झाले होते. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला होते. मात्र आता ऐन दिवाळीमध्ये सोयाबीनच्या दरात (Soyabean Rate) वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

शेतकरी मित्रानो, तुम्हाला सर्व पिकांचा रोजचा बाजारभाव घरात बसून पाहायचा असेल तर आजच Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये डाउनलोड करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही अगदी मोफत मध्ये महाराष्ट्रातील सर्व पिकांचा रोजचा बाजारभाव चेक करू शकता. तसेच यामध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, हवामान अंदाज, सरकारी योजनाना थेट अर्ज, पशु खरेदी विक्री यांसारख्या अनेक सुविधा फुकट मध्ये मिळत आहेत. यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वरून Hello Krushi डाउनलोड करा आणि सर्व सुविधांचा लाभ घ्या

‘येलो मोझॅक किडीचा’चा प्रादुर्भाव

ऐन शेंगा भरणीच्या काळात सोयाबीनवर ‘येलो मोझॅक किडीचा’चा प्रादुर्भाव झाल्यामुळे पीक खराब झाले होते. या कीडीमुळे यावर्षी सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट झाली. या किडीचा प्रादुर्भाव केवळ विदर्भातील सोयाबीन पिकावरच नव्हे तर मध्य प्रदेश (Madhyapradesh) आणि तेलंगणातील (telangana) सोयाबीन पिकालाही मोठा फटका बसला. 

सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरात वाढ होऊन सामान्यांच्या रोषाला सामोरे जावे लागू नये. म्हणून सरकारने आगाऊ तरतूद म्हणून सोया तेल आणि सोया ढेप आयातीचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे मागील आठवड्यात सोया तेलाच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. आगामी काळातील सोयाबीन दरातील चढ-उतारांबाबत सध्या तरी काही बोलणे अवघड आहे.

error: Content is protected !!