हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनला योग्य (Soyabean Rate) तो दर मिळत नाहीये. गेल्या वर्षभरापासून सोयाबीनचे दर हे प्रति क्विंटल 5000 च्या आसपास रेंगाळताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, आज बुलढाणा येथे संतापलेला एक शेतकरी चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन या शेतकऱ्याने आपला रोष व्यक्त केला. आपल्या सोयाबीनला चांगला दर मिळत नसल्याने, या शेतकऱ्याने संतापाच्या भरात बुलढाणा बाजार समितीत आणलेली स्वतःची सोयाबीन रस्त्यावर (Soyabean Rate) ओतून आपला संताप व्यक्त केला.
हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन या शेतकऱ्याने (Soyabean Rate) आक्रमक पवित्रा घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रवी महानकार असे या शेतकऱ्यांचे नाव असून, तो अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा येथील राहणारा आहे. त्याने आतापर्यंत 100 क्विंटल सोयाबीन विक्री केल्याचे म्हटले आहे. मात्र वर्षभरापूर्वी पडलेले सोयाबीन दर वाढत नसल्याने, आपले मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीनला कमीत कमी 6 हजारांचा दर मिळावा. अशी मागणी या शेतकऱ्याने रस्त्यावर कोयता आणि पिस्तूल घेऊन आंदोलन करताना केली आहे.
का उचलले कोयता-पिस्तूल? (Soyabean Rate Farmer Became Aggressive)
माझ्यासारख्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीनला भाव नसल्यामुळे नुकसान होत आहे. कोणीतरी पुढे यायला पाहिजे? शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. ही भावना मनात सलत असल्याने, आपण बाजार समितीत विक्रीला आणलेली सोयाबीन रस्तावर ओतली. आणि हातात पिस्तूल आणि कोयता घेऊन हे आंदोलन केले आहे. असे शेतकरी रवी महानकर यांनी या घटनेतबाबत म्हटले आहे. दरम्यान, शेतकरी रवी महानकर हातात कोयता आणि पिस्तूल घेऊन आंदोलन करत असल्याचे समाजतच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रवी महानकर यांना अटक केली आहे.
सोयाबीन पिकाला फटका
दरम्यान, यावर्षी पावसाळ्यात सुरुवातीला पाऊस एक महिना उशिराने दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. असे असतानाच ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. ज्यामुळे यावर्षी राज्यातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. एकरी उत्पादनात मोठी घट झाली आहे. अशातच आता सोयाबीनला दर मिळत नसल्याने उत्पादन खर्चही मिळत नाहीये. त्यामुळे शेतकरी आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे.