Soyabean Rate : सोयाबीन दरात मोठी घसरण; 2300 रुपये क्विंटल मिळतोय भाव!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या सोयाबीन दराने (Soyabean Rate) तळ गाठला आहे. एकीकडे विदर्भ-मराठवाड्यात राजकीय नेत्यांची (Political leaders) रणधुमाळी (Lok sabha election 2024) सुरु आहे. तर त्याच वेळी विदर्भ-मराठवाड्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर 2300 रुपये क्विंटल प्रति क्विंटलपर्यंत खाली घसरलेले पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबाबत (Farmers) सत्ताधाऱ्यांना आणि राजकीय मंडळींना कोणतेही सोयरेसुतक नसल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी राज्यातील वरोरा (Warora) बाजार समितीत सोयाबीनला 2300 रुपये प्रति क्विंटल इतका निच्चांकी दर मिळाला आहे. तर लासलगावजवळील विंचूर बाजारात देखील सोयाबीन दराने (Soyabean Rate) 3000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण नोंदवली आहे.

हमीभावापेक्षा कमी दर (Soyabean Rate Today)

विशेष म्हणजे बाजारात एखाद्या मालाची आवक घटलेली असेल. तर त्याच्या किमतीमध्ये सुधारणा होते. मात्र, सोयाबीन बाजारात आवक मोठ्या प्रमाणात घसरलेली आहे. मात्र, दरवाढ होण्याऐवजी दिवसेंदिवस सोयाबीनचे दर (Soyabean Rate) उतरणीकडे झुकत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोयाबीनसाठी यावर्षी केंद्र सरकारने 4600 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव (Minimum Support Price) निर्धारित केला आहे. मात्र, असे असतानाही काही निवडक बाजार समित्या (Market Committees) वगळता सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. ज्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा पाय दिवसेंदिवस खोलात चालल्याचे पाहायला मिळत आहे.

कुठे झालीये घसरण?

राज्यात सध्याच्या घडीला जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी 3700 ते 4500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-शेगाव बाजार समितीत सध्या कमाल 4000 ते किमान 2300 रुपये तर सरासरी 3800 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. नाशिक जिल्ह्यतील लासलगाव – विंचूर बाजार समितीत सध्या कमाल 4615 ते किमान 3000 रुपये तर सरासरी 4550 रुपये प्रति क्विंटल, छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत सध्या कमाल 4451 ते किमान 3000 रुपये तर सरासरी 3726 रुपये प्रति क्विंटल, धुळे बाजार समितीत सध्या कमाल 2645 ते किमान 2645 रुपये तर सरासरी 2645 रुपये प्रति क्विंटल, हिंगणघाट बाजार समितीत सध्या कमाल 4850 ते किमान 2900 रुपये तर सरासरी 3900 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

error: Content is protected !!