Soyabean Sowing : सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ यंत्र; वाचा.. काय आहे ‘या’ यंत्राचे फायदे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचा खरीप हंगाम महिनाभरावर (Soyabean Sowing) येऊन ठेपला आहे. अर्थात शेतकरी लवकरच पेरणीसाठी यंत्राची जुळवाजुळव करणार आहे. सोयाबीन हे राज्यातील खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. सोयाबीनची पेरणी रुंद वरंबा-सरी पद्धतीत सोयाबीन पेरणी वरंब्यावर करण्यात येते. यामध्ये दोन्ही बाजूने सरी पाडण्यात येते. कमी पर्जन्यमानात या सऱ्यामध्ये पावसाचे पाणी साठवून जमिनीत मुरते. त्यामुळे जमिनीत ओलावा अधिक काळ टिकून राहतो तसेच पाऊस जास्त (Soyabean Sowing) पडला तर या सऱ्याद्वारे पाण्याचा निचरा करता येतो.

कोणती पद्धत आहे योग्य? (Soyabean Sowing BBF Machine)

याउलट सोयाबीन पिकास पाण्याचा ताण पडला तर उत्पादनात मोठी घट दिसून येते. तसेच पाऊस जास्त झाला तरी भारी जमिनीत पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे सोयाबीनसाठी रुंद वरंबा व सरी पद्धतीने जलसंधारण तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण सोयाबीन पेरणीच्या (Soyabean Sowing) बीबीएफ यंत्राबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

बीबीएफ पद्धतीचे फायदे?

  • पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरते. त्यामुळे मूलस्थानी जलसंवर्धन होऊन पावसाचा दीर्घकाल खंड पडला तर ओलावा टिकून याचा फायदा होतो.
  • या पद्धतीमुळे चांगली मशागत होऊन बियाण्यांसाठी चांगले वरंबे तयार होतात.गादी वाफे किंवा सऱ्यामध्ये हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. बियाण्याची उगवण चांगली होते व पिकाची पुढील वाढ जोमदार होते.
  • अधिक पाऊस झाला तर जास्तीचे पाणी योग्य पद्धतीने निचरा होण्यास व रुंद वरंबे सोबतच दोन्ही बाजूकडील सऱ्यामुळे मदत होते.
  • बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने आवश्यक रुंदीचे वरंबे दोन्ही बाजूने सऱ्यासहतयार करणे, पेरणी करणे व खते देणे अशी विविध कामे एकाच वेळी करता येतात.
  • मजुरांची तसेच ऊर्जेची जवळजवळ 40 ते 60 टक्के बचत होते.
  • परिस्थितीनुसार सरासरी पाच ते सात हेक्टर क्षेत्र प्रतीदिन पेरणी करता येते.
  • पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत सरासरी 20 ते 25 टक्के पर्यंत अधिक जलसंधारण आणि 20 ते 25 टक्के पर्यंत उत्पादनात वाढ होते.
  • आंतर मशागत करणे शक्य होते तसेच तण नियंत्रणाच्या दृष्टीने उगवत पूर्व तणनाशकांचा वापर केल्यास प्रभावी तण नियंत्रण होते.
  • सोयाबीन तसेच कपाशी, तुर आणि हळद इत्यादी पिकांची लागवड या पद्धतीने करता येते.

कशी आहे लागवड पद्धत?

  • योग्य खोलीवर व प्रमाणामध्ये बियाण्यांचे खतासह रुंद वरंबा सरी पद्धतीने विविध पिकांची पेरणी करण्यासाठी बीबीएफ यंत्र आहे. रब्बी हंगामामध्ये भुईमूग व हरभरा लागवड या यंत्राने करता येते.
  • या यंत्राच्या सहाय्याने पिकानुसार योग्य रुंदीचे वरंबे तयार करून जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी तर कमी अंतरावरील पिकाच्या चारओळी रुंद वरंबा वर येतील यानुसार नियोजन करून वरंब्यावर लागवड करता येते.
  • सपाट वाफे पद्धतीच्या तुलनेत रुंद वरंबा सरी पद्धतीमुळे सोयाबीन उगवण दोन दिवस अगोदर तसेच जोमदार झाल्याचे सिद्ध झाले आहे.
error: Content is protected !!