Soyabean : पेरलेले सोयाबीन उगवले नाही; शेतकऱ्यांची कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी (Soyabean) । एका खाजगी कंपनीचे बियाणे शेतात पेरल्यानंतर उगवले नसल्याने परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात येणाऱ्या तुरा गावातील चार शेतऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जिल्ह्यात मोसमी पाऊस आधीच उशिरा आला आहे. त्यात पेरलेले बियाणे उगवत नसल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणावा अशी स्थिती निर्माण झाली आहे.

पाथरी तालुक्यातील तुरा येथील शेतकरी परसराम राठोड, धनंजय आडसकर, अमोल गायकवाड, भागवत ढाणे या शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. तुरा येथील या चार शेतकऱ्यांनी रायझिंग सन सिड्स प्रा.लि.कंपनीच्या आर एस २२८ वाणाच्या १३ सोयाबीनच्या बॅग १ जुलै रोजी तुरा शिवारातील आपआपल्या शेतांमध्ये पेरणी केल्या होत्या. पेरणीनंतर पाच दिवस झाले तरीही जमिनीतून अंकुर बाहेर येत नसल्याने या शेतकऱ्यांनी निरीक्षण व पाहणी केली असता सदरील बियाणे जागेवर नासुन गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

यासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्यांनी संपर्क साधला परंतु त्यांच्याकडून पाहणी करण्यात आल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे येत असल्याने शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे धाव घेत लेखी तक्रार केली आहे. कंपनीकडून फसवणूक झाल्याचे म्हणत आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

फसवणुक झाली?

रायझिंग सन सिड्स प्रा. लि. कंपनीच्या आरएस २२८ या सोयाबीन वाणाच्या एकाच लॉट मधील बियाण्याची पेरणी आम्ही चार शेतकऱ्यांनी केली होती. यामध्ये साधारणता पाच सेंटीमीटर खोलीवर ही पेरणी करण्यात आली होती. माझ्याकडे ४ एकर शेती असुन यापैकी २ एकर शेत्रावर बैलजोडीच्या साह्याने २ बॅगची पेरणी केली होती. तर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी केली होती. पेरणीपूर्वी पाऊस पडल्याने जमिनीमध्ये आवश्यक ओल होती. परंतु पेरणीनंतर पाच दिवस झाले तरी पेरणी उगवली नसल्याचे लक्षात आल्याने आम्ही शेतकऱ्यांनी पाहणी केली असता बियाणे जागेवर नसून गेल्याचे आमच्या निदर्शनास आले. यावेळी पेरलेल्या क्षेत्रावर १ टक्काही उगवणशक्ती झाली नाही. आमची मोठी फसवणूक झाली आहे असे मत धनंजय आडसकर या शेतकऱ्याने व्यक्त केले.

error: Content is protected !!