Soyabean Variety : ‘हे’ आहेत सोयाबीनचे चार प्रमुख वाण; ज्यांना शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदा मॉन्सून काळात अर्थात जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता (Soyabean Variety) वर्तवण्यात आली आहे. परिणामी, यंदा खरिप हंगामामध्ये सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढणार असा दावा होत आहे. दरम्यान जर तुम्हीही यंदा सोयाबीन लागवडीच्या तयारीत असाल तर आज आपण सोयाबीनच्या लोकप्रिय वाणांबद्दल जाणून घेणार आहोत. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये या वाणांच्या सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. अनेकांनी या जातीच्या लागवडीला पसंती दाखवली आहे. अशा परिस्थितीत या वाणांची विशेषतः समजून घेणे (Soyabean Variety) शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

‘ही’ आहेत चार महत्वाची वाण (Soyabean Variety For Farmers)

1. ग्रीन गोल्ड 3444 वाण : ग्रीन गोल्ड 3444 हे सोयाबीन वाण 95 ते 100 दिवसांच्या कालावधीत परिपक्व होते. या जातीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फुलधारणा होते. कृषीतज्ज्ञांच्या माहितीनुसार, या जातीच्या सोयाबीनला (Soyabean Variety) लांबट/लहान आकाराची पाने असल्याने खोडापर्यंत सुर्यप्रकाश मिळतो, हेच कारण आहे की या जातीला मुबलक प्रमाणात फुलधारणा होते. जवळपास 60 टक्के शेंगा 4 दाणे असलेल्या असतात. पाणी साचलेल्या ठिकाणी सुद्धा सोयाबीनचे हे वाण तग धरून राहते. यामुळे अतिवृष्टी होत असलेल्या भागात याची लागवड केली तरीदेखील बऱ्यापैकी उत्पादन मिळू शकणार आहे.

2. केडीएस 992 : या जातीला फुले दूर्वा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखले जाते. महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ केलेला हा सोयाबीनचा एक उत्कृष्ट वाण आहे. या जातीचे पीक सरासरी 100 ते 105 दिवसात परिपक्व होते. या जातीला जास्तीत जास्त फांद्या लागतात. विविध कीटकांना आणि रोगांना ही जात कमी प्रमाणात बळी पडते. या जातीचे दाणे टपोरे आणि वजनदार असतात. जर तुम्ही टोकन पद्धतीने लागवड करण्याच्या तयारीत असाल तर या जातीची तुम्ही निवड केली पाहिजे.

3. एमएयुएस 612 : या जातीचे सोयाबीन पीक ऍव्हरेज 100 दिवसात काढणीसाठी तयार होते. हा वाण प्रतीकुल वातावरणात देखील तग धरुन राहतो. उदा. अतीव्रुष्टी/कमी पाऊस ई. परिस्थितीमध्ये या जातीच्या सोयाबीन पिकातून चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. या जातीचे पीक उंच वाढते. जेव्हा पीक हार्वेस्टिंग साठी तयार होते तेव्हा शेंगा तडकत नाहीत. यामुळे नुकसान कमी होते. राज्यातील हवामान या जातीसाठी अनुकूल असल्याचे आढळून आले आहे.

4. केडीएस 726 : केडीएस 726 अर्थातच फुले संगम ही जात राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. या जातीच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळत आहे. याचा पीक परिपक्व कालावधी हा जवळपास 105 ते 110 दिवस एवढा आहे. या जातीच्या सोयाबीनचे दाणे टपोरे आणि आकर्षक असतात. टोकन पद्धतीने लागवड करायची असली तर हा वाण उत्कृष्ट ठरतो. मात्र येलो मोजक आणि किडींना लवकर बळी पडतो. यामुळे या जातीची लागवड करायची झाल्यास योग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे.

error: Content is protected !!