Soyabean Variety : सोयाबीनचे ‘एनआरसी 152’ वाण; कमी पावसाळ्यातही देते अधिक उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सोयाबीनची लागवड (Soyabean Variety) मोठ्या प्रमाणात केली जाते. प्रामुख्याने खरीप हंगामासह उन्हाळी सोयाबीनचे देखील मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगली कमाई देखील होते. मात्र, गेल्या वर्षी शेतकऱ्यांना कमी पावसासह, अल्प दराचा देखील सामना करावा लागला. मात्र, आता यंदाचा खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भाव मिळणे शेतकऱ्यांच्या हातात नसले तर दर्जेदार बियाण्याच्या माध्यमातून अधिक उत्पादन मिळवणे, असा असा अनेक शेतकऱ्यांचा मानस असतो. याच पार्श्वभूमीवर आज आपण सोयाबीनच्या ‘एनआरसी 152’ या वाणाबाबत (Soyabean Variety) अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

‘एनआरसी 152’ ची वैशिष्ट्ये? (Soyabean Variety NRC 152)

सोयाबीनचे ‘एनआरसी 152’ हे वाण (Soyabean Variety) प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यांसाठी विकसित करण्यात आले आहे. हे वाण इतर वाणांच्या तुलनेत लवकर काढणीला येते. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या वाणाने अल्पावधीतच एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या वाणाची महत्वाची विशेषतः म्हणजे हे वाण प्रति हेक्टर 38 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळवून देण्यास सक्षम असते. त्यामुळे या वाणाच्या लागवडीतून शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन मिळवू शकतात.

तीन महिन्यात येते काढणीला

इंदोर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधकांनी हे ‘एनआरसी 152’ सोयाबीन वाण संशोधित केले आहे. या वाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे वाण ऐन हंगामात पावसाचा खंड पडला तरीही या वाणाच्या उत्पादन घटण्यावर फारसा परिणाम होत नाही. ज्यामुळे हे वाण अगदी कमी पाण्यात आणि केवळ ९० दिवसानाच्या कालावधीत उत्पादन मिळवून देण्यास सक्षम आहे. असे कृषी विज्ञान केंद्राने म्हटले आहे. याशिवाय या वाणाच्या सोयाबीनला नैसर्गिकरित्या अन्य वाणांप्रमाणे लायपोक्सीजिनेज ऍसिड 2 चा गंध येत नाही.

महाराष्ट्रात 48 लाख टन उत्पादन

दरम्यान, देशात दरवर्षी एकूण 120 लाख टन सोयाबीन उत्पादन होते. यातील मध्यप्रदेश या राज्यात सर्वाधिक तर दुसऱ्या स्थानी महाराष्ट्र हे राज्य आहे. मागील वर्षी एल-निनोच्या प्रभावामुळे आणि मोझॅक किडीच्या प्रादुर्भावामुळे देशातील सोयाबीन उत्पादनात घट दिसून आली आहे. देशात प्रामुख्याने मध्यप्रदेशात यावर्षी सर्वाधिक 52 लाख टन तर महाराष्ट्रात 48 लाख टन सोयाबीन उत्पादन नोंदवले गेले आहे.

error: Content is protected !!