सोयाबीनच्या गंजीला आग; शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पाथरी ता .प्रतिनिधी

सध्या खरीप पिकांची काढणी सुरु आहे. तालुक्यातील गुंज येथील शेतकऱ्याने शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला शनिवारी रात्री आग लागल्याने सोयाबीनची गंजी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यात शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील गुंज येथील शेतकरी ज्ञानोब कुंडलिकराव नेमाने यांनी गुंज शिवारात गट क्रं 115 मध्ये असणार्‍या मालकीच्या 4 एकरमधील सोयाबीन काढणी करत गंजी लावून ठेवली होती. दरम्यान 5 नोव्हेंबर रोजी पहाटे 3, वाजण्याच्या सुमारास या गंजीस आग लागल्याने गंज जाळून खाक झाली. ही आग नेमकी कशी लागली? हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सदरील शेतकऱ्याचे दोन ते अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे .

error: Content is protected !!