Soybean Disease : सोयाबीनवरील पिवळ्या मोझॅक रोगाचे नियंत्रण कसे करावे? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soybean Disease : राज्यात जुलै महिन्यामध्ये सगळीकडे चांगला पाऊस पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांची पेरणी देखील चांगली झाली आहे. राज्यामध्ये कापूस पिका खालोखाल सोयाबीन पिक देखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र सोयाबीन, कापूस या पिकांवर रोग पडल्याने शेतकरी हतबल होतात. या रोगाचे वेळीच नियंत्रण न केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. दरम्यान मागच्या वर्षी देखील सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला होता. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. परिणामी त्यांना पीक उपटून टाकण्याची वेळ देखील आली होती. त्यामुळे या रोगावर योग्य ते व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

सध्या काही भागातील सोयाबीन पिकाची लागवड होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटला आ. हे सोयाबीनचे पीक एकदम जोमात आले असले तरी काही ठिकाणी पिकांवर यंदा देखील या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव ओळखून वेळीच उपाययोजना करणे देखील खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून उत्पादनात होणारी घट टाळता येईल. (Soybean Disease)

रोगाची लक्षणे नेमकी कोणती?

  • या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो
  • झाडांची पाने आकाराने लहान होतात
  • ज्या झाडाला रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्या झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते
  • पानांवर सुरकुत्या पडतात आणि ती ओबडधोबड होतात
  • जर लहान अवस्थेत झाडावर या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर ते संपूर्ण झाड पिवळे पडते झाडांना शेंगा कमी लागतात आणि जर शेंगा लागल्याच तर त्यामध्ये दाणे भरत नाहीत त्यामुळे उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात घट होते.

रोगाचा प्रसार कसा होतो?

या रोगाचा प्राथमिक प्रसार बियाणामार्फत तर दुय्यम प्रसार किडीमार्फत होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. यामध्ये प्रामुख्याने पांढरी माशी व मावा या किडींचा समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन वर पिवळ्या मोझॅकची लक्षणे दिसले तर लगेचच उपाय करणे गरजेचे आहे.

याचे व्यवस्थापन कसे करावे?

  • सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोगास बळी न पडणाऱ्या वाणांची लागवड करावी
  • कीड रोगांच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सतत निरीक्षण करावे
  • प्रादुर्भावग्रस्त पाने वेळोवेळी नष्ट करावेत ज्यामुळे इतर झाडांवर होणारा रोगाचा प्रसार टाळता येईल
  • बिगर हंगामी सोयाबीन लागवड टाळावी
  • लागवडीनंतर सुरुवातीचे किमान ४० ते ४५ दिवस पीक तणविरहित ठेवावे

रोगवाहक किडींचे नियंत्रण कसे करावे?

रोगवाहक किडींचे नियंत्रण करणे खूप महत्त्वाचे आहे. या किडींच्या प्रतिबंधासाठी तुमच्या शेतामध्ये निळे व पिवळे सापळे लावणे खूप खूप गरजेचे आहे. यासाठी एकरी २५ याप्रमाणे पिकांच्या समक्ष उंचीवर लावावे. पीक उगवल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टीन याच्या फवारण्या देखील करणे गरजेचे आहे. असं केल्यास याचा प्रादुर्भाव रोखता येईल

error: Content is protected !!