Soybean Market Price : सोयाबीन बाजारातील किंमती चिंताजनक, पहा आज किती मिळाला भाव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या (Soybean Market Price) संपताना दिसत नाहीत. कधी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने तर कधी शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी नाराज झाला आहे. किंबहुना, सध्या राज्यातील शेतकरी कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने आंदोलन करत आहेत. दरम्यान, सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

सोयाबीन हे मराठवाड्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र आहे. आता सोयाबीन (Soybean Market Price) काढणीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण सोयाबीनचे भाव खाली आले आहेत. सध्या अनेक मंडईंमध्ये सोयाबीनला प्रतिक्विंटल कमाल दर 4000 -5000 रुपये पर्यंत मिळत आहे. तर सर्वसाधारण दर 3000 ते 4000 पर्यंत आहेत. वर्षभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या लागवडीच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीनचे भाव कोसळल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

सध्या आवक कमी असली तरी देखील सोयाबीन दाराला चांगली किंमत मिळत नाहीये. मात्र इथून पुढे खरीप सोयाबीनची कंपनी सुरु होईल आणि बाजारात आवक वाढेल. मात्र आवक वाढली की किंमत कमी हे बाजाराचे सूत्र आहे. असे असताना अवाक कमी असतानाच सोयाबीनचा भाव गडगडला आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

काय आहे आजचे बाजारातील चित्र ?

आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभावानुसार आज सोयाबीनला (Soybean Market Price) सर्वाधिक कमाल 5302 रुपयांचा भाव मिळाला आहे. हा भाव लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 2570 क्विंटल इतकी सोयाबीनची आवक झाली याकरिता किमान भाव ४६०० कमाल भाव ५३०२ आणि सर्वसाधारण भाव 5100 इतका मिळाला आहे.

तर आज सर्वाधिक आवक देखील लातूर बाजार समितीतच मिळाली आहे.

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
03/10/2022
जळगाव क्विंटल 102 4100 4800 4500
माजलगाव क्विंटल 1012 4000 4800 4500
कारंजा क्विंटल 1600 4550 5150 4880
श्रीरामपूर क्विंटल 14 4000 4700 4500
तुळजापूर क्विंटल 135 4500 4800 4750
मोर्शी क्विंटल 72 4000 4600 4300
राहता क्विंटल 25 4300 4875 4500
सोलापूर लोकल क्विंटल 515 2705 5040 4660
अमरावती लोकल क्विंटल 1947 4750 4970 4860
नागपूर लोकल क्विंटल 441 4200 5084 4863
हिंगोली लोकल क्विंटल 180 4699 5005 4852
कोपरगाव लोकल क्विंटल 107 4201 5056 4848
मेहकर लोकल क्विंटल 500 4200 4900 4500
ताडकळस नं. १ क्विंटल 50 4800 5100 5000
लातूर पिवळा क्विंटल 2570 4600 5302 5100
जालना पिवळा क्विंटल 1331 3900 5151 4800
अकोला पिवळा क्विंटल 987 4000 5100 4570
यवतमाळ पिवळा क्विंटल 231 4750 5000 4875
बीड पिवळा क्विंटल 17 4792 4850 4814
भोकर पिवळा क्विंटल 124 3850 4700 4275
मलकापूर पिवळा क्विंटल 218 4145 4950 4560
जामखेड पिवळा क्विंटल 47 4000 4500 4250
परतूर पिवळा क्विंटल 58 4501 4850 4601
गंगाखेड पिवळा क्विंटल 15 5000 5200 5100
तळोदा पिवळा क्विंटल 11 5000 5152 5100
धरणगाव पिवळा क्विंटल 93 4600 5035 4987
नांदगाव पिवळा क्विंटल 11 4591 4591 4591
मुरुम पिवळा क्विंटल 288 4400 5021 4710
आष्टी-जालना पिवळा क्विंटल 30 4375 4651 4400
बोरी पिवळा क्विंटल 10 4705 4705 4705
error: Content is protected !!