Soybean Market Price : सोयाबीनचे दर ढासळले ! पहा आज किती मिळालाय कमाल भाव ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षी सोयाबीनला (Soybean Market Price) चांगले दर होते. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला पसंती दिली. यातच अतिपावसाने उत्पादनात काहीशी झाली आहे. सध्या सोयाबीन काढणी सुरू असून, सोयाबीन शेतकऱ्यांच्या घऱात येताच व्यापाऱ्यांनी दर पाडले आहेत.

सध्या कमाल दर सा़डेचार हजार रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. मागील हंगामात दर सहा ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल होते. काही महिन्यांपूर्वीदेखील दर टिकून होते. पण सोयाबीनचे उत्पादन हाती येताच दर पाडल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.

आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील सोयाबीन (Soybean Market Price) बाजारभावानुसार आज सोयाबीनला सर्वाधिक 5,400 रुपयांचा कमाल दर मिळालाय.

हा दर लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मिळाला असून आज या बाजार समितीमध्ये 945 क्विंटल सोयाबीनची आवक झाली याकरिता किमान भाव 3000 कमाल भाव ५४०० आणि सर्वसाधारण भाव 5000 रुपये इतका मिळाला आहे.

तर सर्वाधिक आवक ही लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती इथे मिळाली असून आज बाजार समितीमध्ये 6,154 क्विंटल सोयाबीनची (Soybean Market Price) आवक झाली याकरिता किमान भाव 4700 कमाल भाव 5281 आणि सर्वसाधारण भाव 5100 रुपये इतका मिळालाय.

आजचे सोयाबीन बाजारभाव

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
08/10/2022
लासलगाव – विंचूर क्विंटल 945 3000 5400 5000
औरंगाबाद क्विंटल 107 4125 4771 4442
माजलगाव क्विंटल 1331 4000 4851 4600
उदगीर क्विंटल 970 5150 5290 5220
परळी-वैजनाथ क्विंटल 1200 4251 5060 4765
तुळजापूर क्विंटल 135 4800 5000 4950
सोलापूर लोकल क्विंटल 418 4005 5110 4805
अमरावती लोकल क्विंटल 693 4400 4750 4575
हिंगोली लोकल क्विंटल 300 4640 5041 4840
कोपरगाव लोकल क्विंटल 543 3700 4949 4699
वडूज पांढरा क्विंटल 100 4800 5000 4900
लातूर पिवळा क्विंटल 6154 4700 5281 5100
जालना पिवळा क्विंटल 5321 3500 4950 4660
अकोला पिवळा क्विंटल 759 3995 5005 4600
चोपडा पिवळा क्विंटल 60 4761 4811 4775
आर्वी पिवळा क्विंटल 42 4300 4800 4500
चिखली पिवळा क्विंटल 143 4050 4900 4475
बीड पिवळा क्विंटल 142 3690 5001 4546
वाशीम पिवळा क्विंटल 1500 4250 5000 4500
वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 150 4550 5100 4800
भोकरदन पिवळा क्विंटल 69 3900 4200 4000
भोकर पिवळा क्विंटल 248 3902 4935 4418
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 136 4400 4900 4650
मलकापूर पिवळा क्विंटल 309 4100 5071 4350
शेवगाव पिवळा क्विंटल 9 4300 4700 4700
गंगाखेड पिवळा क्विंटल 10 4800 5100 5000
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 1022 3800 4500 4300
आंबेजोबाई पिवळा क्विंटल 100 4300 4900 4800
औराद शहाजानी पिवळा क्विंटल 102 4750 5100 4925
मुरुम पिवळा क्विंटल 751 4200 5056 4628
उमरखेड पिवळा क्विंटल 50 5000 5200 5100
भंडारा पिवळा क्विंटल 4 4000 4000 4000
सिंदी(सेलू) पिवळा क्विंटल 195 4205 4750 4650
error: Content is protected !!