Soybean Rate : आज सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soybean Rate : राज्यात पाऊस नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. सोयाबीनच्या दराबद्दल पाहिले तर मागच्या काही दिवसापासून सोयाबीनचे दर कमीच आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दर वाढण्याची अपेक्षा आहे. राज्यातील अनेक शेतकरी आजही सोयाबीनची विक्री टप्प्याटप्प्याने करत असल्याचे दिसत आहे. (Soybean Rate)

सोयाबीनला जास्तीचा बाजारभाव मिळेल या आशेने अनेक शेतकऱ्याने सोयाबीनची साठवणूक करून ठेवली आहे. मात्र यावर्षीचा सोयाबीन चांगला उगवून आला असून साठवणूक करून ठेवलेल्याच सोयाबीनला भाव मिळत नाही तर आगामी काळात निघणाऱ्या सोयाबीनला भाव मिळेल का असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरम्यान आज सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला याबद्दल जाणून घेऊयात.

आज अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची सर्वात जास्त 2568 क्विंटल आवक झाली. तर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक 5 हजार 50 रुपये दर मिळाला. मागच्या काही दिवसापासून हे दर स्थित असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर राहता कृषी उत्पन्न बाजार समिती, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव(ब) – पालखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक 5 हजार रुपये दर मिळाला आहे.

या ठिकाणी पाहा सोयाबीनचे बाजारभाव

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर सोयाबीनचे दररोजचे बाजारभाव पाहायचे असतील तर लगेचच गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आपले Hello Krushi हे अँप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला दररोजचे बाजारभाव पाहायला मिळतील. त्याचबरोबर तुम्ही सरकारी योजना, सातबारा उतारा, पशूंची खरेदी विक्री, जमीन मोजणी, हवामान अंदाज इत्यादी गोष्टींची माहिती अगदी मोफत मिळवू शकता त्यामुळे लगेच गुगल प्ले स्टोअरवरून हे अँप इंस्टाल करा.

error: Content is protected !!