Soybean : सोयाबीन पिवळे पडले असेल तर मग करा ‘हे’ उपाय; होईल फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Soybean : सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने मागच्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांचा सोयाबीन लागवडीकडे कल जास्त वळल्याचे दिसत आहे. सध्या सोयाबीनला भाव नसले तरी शेतकरी सोयाबीनची लागवड करत आहेत. बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून सोयाबीन उगवून देखील आले आहेत. सोयाबीन सध्या रोप अवस्थेत असून ते पिवळे पडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यातील बऱ्याच भागांमध्ये सोयाबीन पिवळे पडत आहे त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे.

रोजचे बाजारभाव मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून App डाउनलोड करा

एकीकडे पिकाला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे जर सोयाबीन पिवळे पडले तर उत्पन्न जास्त निघणार नाही याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असतो. त्यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचे सोयाबीन पिवळे पडले आहेत. आता हे सोयाबीन पिवळे पडल्यानंतर काय करावे याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत.

राज्याच्या बऱ्याच भागात मुसळधार पाऊस होताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीन पिवळे पडले आहे. अशा वेळी तूम्ही शेतामध्ये वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी त्याचबरोबर अतिरिक्त पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी. जेणेकरून सोयाबीन पिवळे पडणार नाही.

त्याचबरोबर ०.५ टक्के (५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) फेरस सल्फेट ची पानांवर फवारणी करावी किंवा ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-२ (II) ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून साधारण १५ दिवसाच्या अंतरावर याच्या देखील दोन फवारण्या कराव्यात असे केल्यास जे सोयाबीन पिवळे पडले आहे ते हिरवे होण्यास मदत होईल

‘या’ ठिकाणी पाहा सोयाबीनचा बाजारभाव

शेतकरी मित्रांनो आमचे Hello Krushi हे ॲप प्ले स्टोअर वर जाऊन इंस्टॉल करा आणि रोजचा बाजार भाव पहा तोही अगदी मोफत. हे ॲप आम्ही खास तुमच्यासाठी बनवले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. या ॲपमध्ये तुम्हाला रोजचा बाजार भाव तर पाहायला मिळेलच पण त्याचबरोबर सरकारी योजना, जमीन मोजणी, पशूंची खरेदी विक्री, हवामान अंदाज, त्याचबरोबर रोपवाटिकांची माहिती आणि अन्य कृषी विषयक सर्व माहिती तुम्हाला या ॲपमध्ये मिळेल त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेचच हे ॲप इंस्टॉल करा.

error: Content is protected !!