Soyabean Farming । जुलै महिन्यामध्ये चांगला मुसळधार पाऊस कोसळला आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या रखडलेल्या पेरण्या जुलै महिन्यामध्ये पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, सोयाबीनच्या पेरणी बाबत पाहिले तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे अधिक कल आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सोयाबीनची 228 टक्के इतकी विक्रमी लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास सुरुवात केली होती. ज्वारी, कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन अशा पिकांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा कृषी विभागाने दिले आहे. यामध्ये सर्वात जास्त सोयाबीनची पेरणी झाली आहे. (Soyabean Farming)
नदीकाठची शेती झाली खराब
अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन नदी नाले दुथडी भरून वाहिले त्यामुळे पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले. शेतामध्ये पाणीच पाणी साठल्याचे अनेक जिल्ह्यांमध्ये प्रकार घडले आहेत. यामध्येच नांदेड मधील आसना नदीला महापूर येऊन गेला. यामुळे नदीच्या बाजूची शेती पूर्णपणे खराब झाली आहे. त्यामुळे आता येथील शेतकरी मदतीची वाट पाहत आहेत.
धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविला
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस पडत आहे. त्यामुळे या धरणाच्या पाणी पातळी देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान ही पाणी पातळी सुरळीत ठेवण्यासाठी आता धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामधून आता जवळपास एक लाख 87 हजार 204 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे नदीकाठी संपूर्ण शेती खराब झाली आहे.
आमच्या Hello Krushi याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
शेतकरी मित्रांनो आम्ही खास शेतकऱ्यांचा विचार करून Hello Krushi हे ॲप बनवल आहे. या ॲपच्या माध्यमातून तुम्ही रोजचे बाजारभाव, सरकारी योजना, जमिनीची मोजणी, सातबाराउतारा, तसेच पशुंची खरेदी विक्री इत्यादी घरबसल्या करू शकता. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल तर लगेच प्ले स्टोअर वर जा आणि आपले Hello Krushi हे ॲप इंस्टाल करा.