Soybeans Planting : ‘या’ देशात सोयाबीन लागवड क्षेत्र घटले; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमधील अनेक राज्यांमध्ये यंदा हवामान अनुकूल नसल्यामुळे सोयाबीन लागवडीखालील (Soybeans Planting) क्षेत्रात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या शेवटीपर्यंत ब्राझीलमध्ये केवळ 38.4 टक्के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होऊ शकली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 52.3 टक्के क्षेत्रावर झाली होती.

सोयाबीन पिकास बसला हवामानाचा फटका – Soybeans Planting

मागील दोन आठवड्यांमध्ये हवामानात काही प्रमाणात सुधारणा झाली असली तरी ब्राझीलच्या उत्तर मध्यवर्ती भागात पाऊस खूपच कमी असून, तापमानात मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले आहे. या दोन पद्धतीच्या हवामानाचा फटका यंदा ब्राझीलच्या सोयाबीन पिकास बसला आहे. लागवडीसाठी या दोन्ही पद्धतीचे हवामान अनुकूल नाहीये. मात्र असे असले तरी जोखीम पत्करून शेतकरी सोयाबीन लागवड करत आहे.

ब्राझील हा जगातील सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आहे. त्यानंतर युनायटेड स्टेट्सचा क्रमांक लागतो. सोयाबीनची लागवड ब्राझीलच्या मध्य-पश्चिम भागात सर्वाधिक केली जाते. लागवडीचे चक्र सुमारे 115-130 दिवस चालते. तिकडे सप्टेंबर महिन्याच्या मध्यावधीत सोयाबीन लागवडीस प्रारंभ होतो. ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत जवळपास 50 टक्के क्षेत्रावरील लागवड पूर्ण झालेली असते. मात्र यावर्षी लागवडीखालील (Soybeans Planting) क्षेत्रात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

जाणकारांकडून सांगितले जात आहे की, ब्राझीलमध्ये लागवडीखालील क्षेत्रात घट होण्याबरोबरच आतापर्यंत पेरणी झालेल्या सोयाबीन पिकाची अवस्थाही फार बिकट आहे. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कारण योग्य त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी बियाणे उगवले नसल्याचे सांगितले जात आहे. ब्राझील हा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक व निर्यातदार देश असून, तेथील माटो ग्रोसो (मध्यवर्ती क्षेत्र), पराना आणि रियो ग्रैंड डो सूल (दक्षिण भाग) या राज्यांमध्ये सर्वाधिक सोयाबीन उत्पादन होते. मात्र यंदा ब्राझीलमधील सोयाबीन लागवड (Soybeans Planting) क्षेत्र घटले

error: Content is protected !!