State Government : ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सध्या पावसाअभावी पिके संकटात सापडले असून काही भागातील पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेतकरी चिंतेत आहेत. जुलै महिन्यामध्ये पाऊस पडला त्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली होती. मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस न झाल्याने खरीप पिक वाया जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळाची स्थिती उद्भवू नये म्हणून राज्य सरकारने दुष्काळ ‘वॉर रुम’ करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयामधील वॉर रुममध्ये ही रूम तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. (State Government)
मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांची ‘वॉर रुम’ आहे. त्या रुममध्ये दुष्काळ वॉर रुम तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. याचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज घेणार आहेत. या ‘वॉर रुम’च्या माध्यमातून दुष्काळाच्या छायेमध्ये सापडलेले जिल्हे, तालुके, गाव, वाड्या, वस्त्यांवर निरीक्षण ठेवले जाणार आहे. त्याचबरोबर दुष्काळी भागासाठी उपाययोजना देखील या रूम मधून केल्या जाणार आहेत.
राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यात त्या बऱ्याच भागात यावर्षी दुष्काळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने या दुष्काळग्रस्त परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यांमधील पाणीसाठा आणि स्रोत यांच्या उपलब्धतेनुसार पाण्याचे आरक्षण केले जाणार आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी 2015 मध्ये देखील स्थापना केली होती. या ‘वॉर रुम’च्या माध्यमातून त्यांनी समृद्धी महामार्ग, पुण्यातील रिंग रोड किंवा विमानतळासारखी कामे यासारख्या पन्नास हून अधिक प्रोजेक्टचा आढावा घेतला होता. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने याचे नामांतर करून संकल्प कक्ष सुरू केल होत. मात्र आता सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा एकदा ‘वॉर रुम’ हे नाव कायम ठेवण्यात आले आहे.