Strawberry Farming : हायड्रोपोनिक पद्धतीने स्ट्रॉबेरी लागवड; तरुणाची अल्पावधीत लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करत असताना माती आणि पाणी नसेल तर शेतीमध्ये पिके मिळवण्याबाबत कल्पनाच (Strawberry Farming) केली जाऊ शकत नाही. मात्र, शेतीमध्ये सध्या नवनवीन तंत्रज्ञानाचा शिरकाव होत असून, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे शेतकरी हायड्रोनिक्स या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करत, विना मातीचे मोठी कमाई करत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या शेतीबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने हायड्रोनिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करत, स्ट्रॉबेरी पिकाचे (Strawberry Farming) उत्पादन घेतले आहे. ज्यातून त्याला लाखो रुपयांची कमाई झाली आहे.

स्ट्रॉबेरी पिकाची निवड (Strawberry Farming Success Story)

धीरज वर्मा असे या शेतकऱ्याचे नाव असून, तो उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील रहिवासी (Strawberry Farming) आहे. धीरज वर्मा हा बीएस्ससी पदवीधर असून, त्याने शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता शेतीची वाट धरली. त्यासाठी त्याने पॉलीहाऊस उभारून हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करण्याचा निर्धार केला. यासाठी त्याने महाराष्ट्रातील महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी येणाऱ्या स्ट्रॉबेरी या पिकाची निवड केली. विशेष म्हणजे विना माती आणि अगदीच कमी पाण्यात त्याने स्ट्रॉबेरीचे हे उत्पादन घेतले आहे.

तीन लाखांचे मिळाले उत्पन्न

हायड्रोपोनिक प्रकारची शेती (Strawberry Farming) ही इस्राएलमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. या पद्धतीमध्ये केवळ पाण्यावर पिके घेतली जातात. शेतकरी धीरज वर्मा यांनी हीच हायड्रोपोनिक पद्धत वापरून स्ट्रॉबेरीची रोपे लावली आहेत. साधारणपणे त्यांना एका हंगामामध्ये धीरज वर्मा यांनी पाच टन स्ट्रॉबेरीचे उत्पादन काढले आहे. याच स्ट्रॉबेरीच्या उत्पादनातून त्यांना आतापर्यंत एकूण तीन लाख रुपयांचा नफा देखील झाला आहे. सध्या त्यांच्या स्ट्रॉबेरी पिकाची काढणी सुरु असून, त्यांना त्यातून आणखी नफा मिळणार असल्याचे ते सांगतात.

महाराष्ट्राच्या मातीतील पीक

स्ट्रॉबेरी हे एक बेरी वर्गीय फळ आहे. हे एक लहान आकाराचे फळ असून लाल रंगाचे फळ आहे. ते थंड प्रदेशात होते. सुगंध, लाल रंग, रसाळपणा आणि गोडपणा यामुळे हे फळ प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरीमध्ये कर्बोहायड्रेटस जीवनसत्त्व ‘क’ , ‘ब’ आणि कॅल्शियम, लोह, स्फुरद इत्यादी घटक भरपूर प्रमाणात असतात. साधारणपणे महाराष्ट्रातील महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

error: Content is protected !!