Strawberry Farming : स्ट्रॉबेरी शेतीतून शेतकऱ्याने केली कोटींची कमाई; कस केलं नियोजन? जाणून घ्या अधिक…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Strawberry farming : सध्या शेतकरी शेती करताना वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. त्यामुळे शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर जास्त करत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर शेतकरी पारंपारिक शेती सोबतच भाजीपाला लागवड आणि फळबाग लागवड जास्त करत असल्याचे देखील दिसत आहे. तर काही शेतकरी हिरव्या भाजीपाल्याची लागवड करतात तर काही मशरूम, पपई इत्यादी लागवड करून अनेक शेतकरी चांगला नफा कमवत आहेत.

त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी देखील परदेशी पिकांची शेती करून लाखो रुपये कमावले आहेत. अशा अनेक बातम्या आपण ऐकल्या देखील असतील. आज आपण अशाच एका प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहो. उत्तरप्रदेश मधील मुजफ्फरपुर जिल्ह्यातील भोपाळ या ठिकाणच्या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीतून चांगले उत्पन्न घेतल्याचे समजत आहे. सफिक भाई असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

सफिक भाई मुराद नगरच्या गंगनहरजवळ स्ट्रॉबेरीची शेती करत आहेत. ते ११ बीघे जमिनीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करतात. यातून त्यांना चांगला नफा देखील मिळाला आहे, त्यामुळे सगळीकडे त्यांची चर्चा होत आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते स्ट्रॉबेरीची विक्री देखील स्वतः करतात मागच्या दहा वर्षापासून ते स्ट्रॉबेरीचा स्टॉल लावून विक्री करतात त्यामुळे यामधून त्यांना चांगला नफा देखील राहत आहे. दुसऱ्या शेजारील जिल्ह्यातील लोक त्यांच्या स्टॉलवर स्ट्रॉबेरी खरेदी करण्यासाठी आवर्जून येत आहेत.

कोटींची कमाई

याबाबत बोलताना शेतकरी म्हणतो की, स्ट्रॉबेरी शेती करण्यामध्ये खूप मेहनत आहे मात्र मेहनत केली तर यामध्ये चांगला नफा देखील मिळतो. या शेतकऱ्याने आतापर्यंत स्ट्रॉबेरी विकून जवळपास एक कोटी रुपयांची कमाई केली आहे स्ट्रॉबेरी काढण्यासाठी ते मल्चिंगचा वापर करतात.

स्ट्रॉबेरीची लागवड कधी करावी?

कोणत्याही पिकाची लागवड करण्याचा योग्य काळ असतो. तसा स्ट्रॉबेरी लागवडीचा देखील योग्य काळ आहे दरवर्षी हा शेतकरी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करतो. स्ट्रॉबेरीचे उत्पादन सहा महिन्यांमध्ये तयार होते जास्त पाऊस झाला तर स्ट्रॉबेरी शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे शेतामध्ये पाणी काढण्याची व्यवस्था असेलच तरच शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी शेतीची रिस्क घ्यावी.

शेतकऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार. १ बिघा शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची सहा हजार झाडे लावले आहेत. याच्या लागवडीसाठी कॅमेरा जातीचे रोप लावले आहे. हे एक रूप सहा ते आठ रुपयांना मिळते. १ बिघा स्ट्रॉबेरीची शेती केल्यास 70 ते 75 रुपये खर्च होतो मात्र सहा महिन्यानंतर यामध्ये चांगली मेहनत घेतली तर नफा देखील मिळतो असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!