Strawberry Variety : ‘या’ आहेत स्ट्रॉबेरीच्या प्रमुख प्रजाती; वाचा… वाणांची वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन (Strawberry Variety) मोठ्या प्रमाणात घेतले जाते. महाबळेश्वरसह सातारा जिल्हा स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदान दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथील कार्यक्रमात म्हटले होते. अशातच गेल्या काही वर्षांमध्ये स्ट्रॉबेरी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे आज आपण स्ट्रॉबेरीच्या काही महत्वाच्या प्रजातींबद्दल (Strawberry Variety) जाणून घेणार आहोत. प्रामुख्याने नाविन्यपूर्ण पीक असेल तर अशा पिकाच्या प्रजाती शेतकऱ्यांना माहिती असणे खूप आवश्यक असते.

किती येतो लागवड खर्च? (Characteristics Of Major Strawberry Variety)

शेतकरी सध्याच्या घडीला पॉलीहाउस, हाइड्रोपोनिक्स या आधुनिक पद्धतीने स्ट्रॉबेरी लागवड (Strawberry Variety) करू शकतात. मात्र, भांडवलाअभावी काही शेतकऱ्यांना हे शक्य नसेल. तर शेतकरी आपल्या पारंपरिक बेड, ठिबक, मलचिंग पेपर पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड करू शकतात. शेतकऱ्यांना अशा लागवडीसाठी नेहमीप्रमाणे हेक्टरी अडीच लाखांपर्यंत खर्च येण्याची शक्यता असते. तर शेतकऱ्यांना राज्यात 350 ते 400 रुपये प्रति किलो दर हमखास मिळतो.

‘या’ आहेत प्रमुख प्रजाती?

1. चांडलर स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरीची प्रजाती (Strawberry Variety) प्रामुख्याने मिठाई तयार करण्यासाठी वापरली जाते. या वाणाचे फळ मोठे आणि कडक साल असलेले असतात. या जातीच्या एका फळाचे वजन हे 18 ग्रॅम इतके असते. या प्रजातीचे फळ हे चवीला आणि रंग आकर्षक असते. अशक्तपणा किंवा मग आजारपणात चांडलर स्ट्रॉबेरी खाल्लयास गुणकारी मानली जाते.

2. टियागा स्ट्रॉबेरी : टियागा स्ट्रॉबेरी हे वाण लवकर तोडणीला येते. या वाणाच्या एका फळाचे वजन हे 9 ग्रॅम असते. टियागा हे वाण मूळचे कॅलिफोर्नियातील असून, उष्ण वातावरणात पटापट वाढते. या वाणाचे फळ खूप लालसर आणि खूप चवदार असते.

3. टॉरे स्ट्रॉबेरी : टॉरे स्ट्रॉबेरी या वाणाला मध्यम आकाराचे फळ येते. या वाणाच्या एका फळाचे वजन हे मुख्यतः 6 ग्रॅम इतके असते. हे विविध वाण विविध वातावरणात रोगांना बळी पडत नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ते विशेष लोकप्रिय आहे.

4. बेलरुबी स्ट्रॉबेरी : बेलरुबी स्ट्रॉबेरी हे वाण अधिक उत्पादन मिळण्यासाठी चांगले मानले जाते. या वाणाच्या फळाचा रंग लाल आणि चमकदार असतो. तसेच या वाणाच्या फळाची चव गोड असते. या वाणाच्या एका फळाचे वजन हे 15 ग्रॅमपर्यंत असते, ज्यामुळे त्यातून अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.

5. फर्न स्ट्रॉबेरी : इतर स्ट्रॉबेरी वाणाच्या तुलनेत फर्न स्ट्रॉबेरी वाण हे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य मानले जाते. या वाणाचा आकार मध्यम, तर रंग अधिक लालसर असतो. हे वाण आपल्या उत्तम स्वादासाठी, चवीसाठी प्रसिद्ध आहे. या वाणाच्या एका फळाचे वजन हे 25 ग्रॅमपर्यंत असते.

6. सेल्वा स्ट्रॉबेरी : सेल्वा स्ट्रॉबेरी हे वाण सर्वच हंगामामध्ये उपलब्ध होते. या वाणाचा वापर मिठाई निर्मिती व्यवसायामध्ये केला जातो. या वाणाच्या एका फळाचे वजन हे 18 ग्रॅम असते. तसेच या वाणाच्या फळाच्या आकार शंकाकार असतो.

याशिवाय स्ट्रॉबेरीच्या पजारा, एल्बियन, अरोमास, डायमांटे, एवरेस्ट, एवी. 2, एवी. 3 फोर्ट लारमी, हेकर, मारा डेस बोइस, मोंटेरी, पोर्टोला, क्विनॉल्ट, ट्रिब्यूट, ट्रिस्टार, सैन एंड्रियास आणि सीस्केप या अन्य काही प्रजाती आहेत. ज्या आपल्या विविध वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्ध आहेत.

error: Content is protected !!