Stubble Burning : पिकांच्या अवशेषांपासून बायोगॅस निर्मिती करावी – गडकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या उत्तरेकडील राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे अवशेष (Stubble Burning) जाळण्याचा प्रकार थांबवावा. असे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित राज्य सरकारांना मागील आठवड्यात पेंढा जाळण्यावरून (Stubble Burning) फटकारले होते. त्यानंतर आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पिकांचा अवशेषांचे जैव इंधन, एलएनजी अशा विविध उत्पादनांमध्ये रूपांतर करत ही समस्या सोडवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर भर देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. ते नागपुरात बोलत होते.

सध्या देशात शेतातील अवशेषांपासून जैविक पद्धतीने डांबर, जैव इंधन, एलएनजी निर्मिती केली जात आहे. त्यासाठी जैव इंधन, एलएनजी निर्माण करण्यासाठी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशमध्ये 185 प्रकल्प स्थापित झाले आहेत. पानिपत येथे इथेनॉल, डांबर आणि विमानांचे इंधन हे या अवशेषांपासून बनवले जात आहे. सरकारकडून यास गती देण्यासाठी प्रगतीपथावर काम सुरु आहे. असेही गडकरी यावेळी म्हणाले.

पंजाब सरकारला सूचना (Stubble Burning Issue In India)

शेतातील अवशेष जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी व त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे येत्या काळात शेतातील पेंढा जाळण्याचा प्रकार थांबेल. असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान आपण पंजाब दौऱ्यावर असताना तेथील सरकारला शेतातील अवशेषणांची विल्हेवाट लावण्यासाठी एक प्रभावी धोरण राबवण्याची सूचना केली होती. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील अवशेषांपासूनही आर्थिक फायदा होऊ शकेल. असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या प्रदेशात वायु गुणवत्ता व्यवस्थापन समितीने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) समोर दाखल केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे की, “पंजाब सरकार आणि सरकारच्या विविध प्रशासकीय संस्थांनी शेतातील अवशेष जाळण्यासंदर्भातील धोरणाची कठोर आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतातील अवशेष जाळण्याच्या प्रकारास आळा बसेल.”

अवशेष निर्मितीची पार्श्वभूमी

१९६०-७० च्या दशकात भारतातील हरित क्रांतीची सुरुवात झाली. त्यामुळे भारतीय शेतीचे आधुनिक पद्धती आणि तंत्रज्ञान जसे की उच्च उत्पादनाच्या विविध बियाणे, ट्रॅक्टर आणि इतर शेती साधनांचा वापर, नलिका विहिरी, कीटकनाशके यांसारख्या सिंचन सुविधांचा वापर करून औद्योगिक व्यवस्थेत रूपांतर झाले. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने जनावरांचा साहाय्याने शेती करणे थांबले. परिणामी चारा स्वरूपात वापरला जाणाऱ्या शेतातील अवशेषांच्या विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला.

error: Content is protected !!