Success Story : कधीकाळी मजूरी करायचे, 10 एकरात फुलवली स्ट्रॉबेरीची शेती; मुख्यमंत्र्यांची शेताला भेट!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : परिस्थिती माणसाला काहीही काम करायला भाग पाडते. मात्र तुमच्याकडे एखाद्या क्षेत्रातील (Success Story) योग्य ज्ञान आणि त्यातील बारकावे माहिती असल्यास, तुम्ही त्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याने हे सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्रात काही भागांमध्ये मोठ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. त्यातून शेतकरी मोठ्या प्रमाणात कमाई देखील करतात. अलीकडेच राज्यात पांढऱ्या स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग देखील करण्यात आला. मात्र, आज आपण बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात अनुकूल वातावरण नसतानाही, 10 एकरात स्ट्रॉबेरी पिकातून लाखोंची कमाई करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने आपले बरेच आयुष्य हे मजुरीवर काढले आहे.

मजुरीवर काढले दिवस (Success Story 10 Acres Strawberry Farming)

औरंगाबाद जिल्ह्यातील बृजकिशोर मेहता (Success Story) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील बरीच वर्ष हरियाणा या राज्यात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. मात्र, त्या ठिकाणी ते जास्त काळ रोजंदारी करू शकले नाही. मात्र, त्यांनी हरियाणामध्ये विदेशी फळांची शेती कशी करतात. याबाबत माहिती मिळवली होती. ज्यामुळे त्यांना आपल्या गावी परतल्यानंतर शेती करण्यास मोठी मदत झाली. त्याच अनुभवातून त्यांनी अनुकूल वातावरण नसताना देखील स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली आहे.

हरियाणाहुन आणली स्ट्रॉबेरीची रोपे

शेतकरी बृजकिशोर मेहता हे हरियाणामध्ये मजुरीसाठी गेले असताना, त्यांचे कुटुंब पारंपारीक पद्धतीने धान आणि गहू पिकाचे उत्पादन घेत होते. मात्र, त्यातून अधिक उत्पन्न मिळत नसल्याने मेहता यांनी गावी परतल्यानंतर स्ट्रॉबेरी लागवड कारण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी हरियाणा येथून स्ट्रॉबेरीची रोपे उपलब्ध केली. सुरुवातीला त्यांनी केवळ 60 रोपे आणत शेतीची उत्पादकता तपासली. आणि योग्य उत्पादन मिळत असल्याचे पाहून त्यांनी मागील काही वर्षात हळूहळू आपला 10 एकरापर्यंत स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला आहे. इतकेच नाही तर त्यांची स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती पाहून, मागील काही वर्षात आजूबाजूच्या 40 हुन अधिक शेतकऱ्यांनी त्यांच्या भागात स्ट्रॉबेरी लागवड सुरु केली आहे.

मुख्यमंत्र्यांची शेताला भेट

स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती पाहून बिहारचे मुख्यंमत्री नितीश कुमार यांनी देखील एकदा त्यांच्या शेताला भेट दिली आहे. शेतकरी बृजकिशोर मेहता यांनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांकडे बिहारमध्ये शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसाठी शीतगृह उभारण्याची मागणी केली होती. तसेच त्यांनी राज्यात स्ट्रॉबेरी रोपे उपलब्ध होत नसल्याची खंत देखील व्यक्त केली होती.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी बृजकिशोर मेहता यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना आपल्या 10 एकर शेतीत उपलब्ध बाजारभावानुसार, स्ट्रॉबेरी लागवडीचा उत्पादन खर्च वजा 70 लाख लाखांचा वार्षिक निव्वळ नफा मिळतो आहे. ते आपली उत्पादित स्ट्रॉबेरी बिहारसह आसपासच्या अन्य राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवतात. तर आपला 70 टक्के माल ते कोलकाता येथे विक्रीसाठी पाठवतात. त्यामुळे कधीकाळी दुसऱ्याकडे मजुरी करणारे शेतकरी बृजकिशोर यांच्याकडे सध्या अनेक जण स्ट्रॉबेरीच्या शेतात काम करत आहे.

error: Content is protected !!