Success Story : नोकरी सोडली; 120 एकरात तरुणाची कोरफड शेती; करतोय कोटींची उलाढाल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशातील शेती क्षेत्राचे चित्र पूर्णतः बदलले (Success Story) आहे. नोकरी, व्यवसायाला महत्व प्राप्त झाले असताना अनेक जण नोकरी सोडून शेतीमध्ये येत आहेत. विशेष म्हणजे हे शेतकरी शेतीमध्ये नवनवीन पिकांची लागवड करत आहेत. अशातच सध्या माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रसार झाल्याने सुशिक्षित तरुणांना शेती करताना मोठा फायदा होत आहे. ज्यामुळे तरुणांना शेतीमधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवण्यास मदत होत आहे. आज आपण अशाच एका इंजिनीअर तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने आपल्या शेतीमध्ये कोरफडीची लागवड (Success Story) करत, एक वेगळा मार्ग निवडला आहे.

2013 मध्ये कोरफड शेतीस सुरुवात (Success Story 120 Acres Aloe Vera Farming)

हरीश धनदेव असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, ते राजस्थानमधील जैसलमेर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे हरीश धनदेव हे जैसलमेर नगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता पदावर कार्य करत होते. मात्र त्यांचे नोकरी मन रमत नसल्याने, त्यांनी शेतीची वाट धरली. यासाठी त्यांनी आपल्या वाळवंटी जमिनीमध्ये कोरफडीची लागवड करण्याचा निर्धार केला.

सुरुवातीला 10 बिघ्यात लागवड

सुरवातीला त्यांनी 2013 मध्ये कोरफडीची शेती करण्यास सुरवात केली. यासाठी त्यांनी बीकानेर कृषी विद्यापीठातून 25 हजार कोरफडीची रोपे उपलब्ध केली. ही रोपे त्यांनी आपल्या 10 बिघे जमिनीमध्ये लावली. हरीश धनदेव यांची एकूण 120 एकर जमीन असून, त्यांनी आपल्या सर्व जमिनीमध्ये कोरफडीची व्यावसायिक शेती करणे सुरु केले आहे.

किती मिळतंय उत्पन्न?

शेतकरी हरीश धनदेव सांगतात, सुरुवातीला अनेकदा मनात शंका येत होती की, आपण कोरफड शेतीला पुढे कसे घेऊन जाणार? कसा कोरफड शेतीला वाढवण्यात मदत होईल. अशातच त्यांनी जैसलमेर येथे ‘नेचुरल एग्रो’ नावाने कंपनी उभारली. याशिवाय ते आपल्या कंपनीसोबतच नामांकित कंपनी पतंजलीला देखील कोरफडीची पूर्तता करत आहे. त्यामुळे त्यांना शेतीसोबत कंपनीच्या माध्यमातून देखील मोठा फायदा होत आहे. याशिवाय ते आपल्या शेतीमध्ये उत्पादित कोरफडीची निर्यात देखील करतात. त्यांचा स्वतःच्या कंपनीसोबतच कोरफड शेतीतून एकूण 2 ते 3 कोटींचा वार्षिक टर्नओव्हर आहे.

गुणवत्तापूर्ण उत्पादनावर विशेष भर

शेतकरी हरीश धनदेव सांगतात, आपण कोरफडीची शेती करताना गुणवत्तापूर्ण उत्पादनावर विशेष भर देत आहोत. आपल्या ग्राहकांना आपण कोणतीही तक्रार करण्याची संधी देत नाही. परिणामी, सध्या हरीश धनदेव हे कोरफड शेतीच्या माध्यमातून कोटींची उलाढाल करणारे हरीश लाखो तरुणांसाठी प्रेरणास्रोत ठरले आहे. कारण त्यांनी एका चांगल्या पगाराच्या नोकरीला रामराम करत, शेतीमध्ये पाऊल ठेवले होते. ज्यामुळे त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती.

error: Content is protected !!