Success Story : 12 वी पास शेतकऱ्याची कमाल; शेतीसह पोल्ट्री, दूध व्यवसायातुन लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात शेतकरी सध्या पिकांमध्ये विविधता (Success Story) आणत मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवत आहे. केवळ पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता शेतकरी भाजीपाला, फळपिके यांच्या लागवडीवर भर देत आहे. याशिवाय काही शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत आहे. याचा शेतीतून सेंद्रिय पद्धतीने पिके घेण्यासाठी फायदा होत आहे. विशेष म्हणजे शेतीमध्ये विविधता आणल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील मिळत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे ऊस पीक सोडून सर्व प्रकारची पीके घेतात. याशिवाय शेती, पोल्ट्री, दूध व्यवसाय, मशरूम शेती करत एकत्रिपणे वार्षिक 30 लाखांपर्यंत कमाई (Success Story) करत आहे.

विविध पिकांची लागवड (Success Story Of Integrated Farming)

शरद कुमार सिंह असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्याच्या हरगनपुर गावचे रहिवासी आहे. शरद कुमार यांनी प्रगतिशील शेतकरी (Success Story) म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांनी 1991 मध्ये शेती करण्यास सुरुवात केली. तेव्हा ते 7 एकर जमिनीमध्ये पिकांची लागवड करत होते. मात्र, आज 40 एकरात विविध पिकांची लागवड करत असल्याचे ते सांगतात. आपल्या या 40 एकरात ते ऊस पीक सोडून सर्व प्रकारच्या पिकांची लागवड करतात. यामध्ये प्रामुख्याने काकडी, गिलके, पालक, वांगी, डांगर, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो अशा हंगामी भाजीपाल्याची लागवड करतात. याशिवाय काही जमिनीत गहू, धान, तेलबिया यांच्या लागवडीसह वेळोवेळी मशरूम उत्पादन देखील घेतात. इतकेच नाही तर त्यांनी शेतीला पोल्ट्री आणि डेअरी व्यवसायाची जोड दिली आहे.

शेतीमध्ये आधुनिक साधनांचा वापर

शेतकरी शरद कुमार सिंह सांगतात, आपण शेतीमध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक मशिनरीचा (Success Story) वापर करतो. शरद सिंह गहू उत्पादनात नेहमीच पुढे असतात. ज्यामुळे त्यांना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक वेळा सन्मानित करण्यात आले आहे. शेतीला जोडून पोल्ट्री आणि दुग्ध व्यवसाय करताना आपल्याला वार्षिक 2.5 लाख रुपयांचा खर्च येतो. तर त्यातून जवळपास 6-7 लाख रुपयांची कमाई हमखास होत असल्याचे ते सांगतात. याशिवाय गहू, धान, तेलबिया आणि भाजीपाल्याच्या लागवडीसाठी एकूण 10 लाख रुपये वार्षिक खर्च येतो. त्या सर्व पिकांमधुन वार्षिक खर्च वजा जाता 20 ते 25 लाख रुपयांची कमाई हमखास मिळत असल्याचे ते सांगतात.

शेणखत, गोमुत्राचा प्रभावी वापर

शरद कुमार सिंह हे अलीकडेच वाराणसी येथील विद्यापीठाच्या पाचव्या कृषी काँग्रेस कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांना कृषि राज्यमंत्री लाखन सिंह राजपूत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय ते वेळोवेळी बिजनोर येथील कृषि विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांचे शेतीसाठी मार्गदर्शन घेतात. शेतकरी शरद कुमार सिंह सांगतात, आपण शेतीसाठी शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेल्या जैविक खते आणि कीटकनाशकांचा पिकांसाठी वापर करतो. ज्यामुळे आपल्याला सध्या अधिकचे उत्पन्न मिळण्यास मदत झाली असून, आपला उत्पादन खर्च देखील कमी झाल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!