Success Story : 26 वाणांची, 2000 झाडे, ऑनलाईन आंबा विक्रीतून शेतकऱ्याची 5 लाखांची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात आंबा बाजारात (Success Story) दाखल होत आहे. विशेष म्हणजे बाजारात पाहिजे तितकी आवक नसल्याने, आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा दर देखील मिळत आहे. अशातच आता एका शेतकऱ्याने आपल्या शेतात 26 वाणांच्या मदतीने आंबा पिकाची लागवड केली असून, त्याला आतापर्यंत ऑनलाईन विक्रीतून पाच लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने आपला सर्व आंबा व्यापाऱ्यांना न विकता थेट ग्राहकांना विक्री केला आहे. ज्यामुळे त्यांना अधिकचा फायदा झाला आहे. आज आपण या शेतकऱ्याच्या आंबा शेतीही यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

26 प्रकारच्या वाणांची लागवड (Success Story Mango Farming Online Sale)

शेतकरी युवराज सिंह असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते मध्यप्रदेशच्या अलीराजपुर जिल्ह्यातील छोटा उंडवा गावचे रहिवासी आहे. शेतकरी युवराज यांनी आपल्या शेतीमध्ये एकूण 26 वाणांच्या मदतीने एकूण दोन हजार आंब्याच्या झाडांची लागवड (Success Story) केली आहे. आपली काही झाडे ही वडिलोपार्जित असून, आपण त्यानंतर आंबा शेतीचा काही प्रमाणात विस्तार केल्याचे ते सांगतात. आपल्या आंबा शेतीमध्ये लंगडा, केसर, चौसा, सिंदूरी, राजापुरी, हापुस या प्रमुख जातींच्या आंबा झाडांचा समावेश असल्याचे ते सांगतात. या आपल्या दोन हजार झाडांच्या मदतीने त्यांनी आतापर्यंत थेट ग्राहकांना ऑनलाईन विक्री करून 5 लाखांचा नफा मिळवला आहे. तर त्यातून ऑफलाईन आंबा विक्रीचा नफा वेगळा असल्याचे ते सांगतात.

नूरजहां वाणाची खासियत

शेतकरी युवराज सिंह सांगतात, आपल्या 26 प्रजातीच्या आंब्यांपैकी काही झाडे ही नूरजहां वाणाची आहे. या वाणाची लागवड आपण कलम पद्धतीने केली आहे. या वाणाच्या आंब्याच्या वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे या एका आंब्याचे वजन हे जवळपास तीन किलोपर्यंत असते. विशेष म्हणजे या वाणाच्या आंब्याला ग्राहकांकडून दरही अधिक मिळतो. या वाणाच्या एक आंब्याची किंमत साधारणपणे एक हजार रुपये इतकी आहे. असेही त्यांनी नमूद केले आहे.

आधीच मिळते पेमेंट

मध्यप्रदेशातील अलीराजपुर जिल्हा हा प्राकृतिकदृष्ट्या आंबा पिकासाठी योग्य असून, या ठिकाणची माती देखील आंबा पिकासाठी उत्तम आहे. या ठिकाणी उत्पादित होणारा आंबा देशभर सुप्रसिद्ध असून, त्याची बाजारात विशेष ओळख आहे. त्यामुळे ग्राहकांना या ठिकाणच्या आंब्याची खासियत माहिती असल्याने, आपल्याला सर्वच ग्राहकांकडून ऑनलाईन आंबा खरेदी केल्यानंतर माल पोहोचण्याच्या आत पेमेंट मिळते. असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच आपण ऑनलाईन आंबा विक्रीसाठी एक प्लॅटफॉर्म उभारला असून, आतापर्यंत त्यातून 5 लाखांचा नफा मिळाला आहे. याशिवाय 5-5 किलोचे आंबा बॉक्स तयार करून ते बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी देखील पाठवले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!