Success Story : 30 एकरात आंबा लागवड; शेतकरी कमावतोय वार्षिक 6 लाखांचा नफा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आंबा शेती म्हटले की ‘कमी खर्चात, कमी देखभालीत अधिक नफा’ (Success Story) हे गणित ठरले आहे. त्यामुळेच कोकणातील शेतकऱ्याने कधी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही. अर्थात शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीची कास धरल्यास, त्यातून शेती तोट्याची होत नाही. शाश्वत शेतीतून मिळणारे उत्पन्न हे नेहमीच उत्पादन खर्चाच्या अधिक असते. आज आपण अशाच एका आंबा उत्पादक शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी आपल्या 30 एकर रानात आंबा बाग फुलवली आहे. ज्यातून ते वार्षिक 6 लाखांचा निव्वळ नफा (Success Story) कमावत आहे.

हापूस, मल्लिका वाणाची लागवड (Success Story Of Mango Farming)

सत्यनारायण रेड्डी असे शेतकऱ्याचे नाव असून, ते कर्नाटकच्या तुमकुरु जिल्ह्याच्या मधुगिरी तालुक्याच्या अय्यानहल्ली गावचे रहिवासी आहे. त्यांनी आपल्या 30 एकर जमिनीमध्ये हापूस आणि मल्लिका वाणाची आंबा झाडे (Success Story) लावली आहे. विशेष म्हणजे त्यांना आंबा पिकाचे प्रभावी व्यवस्थापन न केल्याने खूप नुकसान सोसावे लागते होते. सुरुवातीला फळमाशी, हॉपर (तुडतुडे) यांसारख्या किडींमुळे त्यांना उत्पादनास फटका बसत होता. इतकेच नाही तर त्यांना बुरशी, डायबॅकसारख्या रोगांचा देखील सामना करावा लागत होता. मात्र, त्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन, आपल्या आंबा पिकाचे योग्य ते रोग व्यवस्थापन करत अधिकचे उत्पन्न मिळवण्यास सुरुवात केली.

कसे केले रोग व्यवस्थापन?

कृषी विभागाच्या सल्लयानंतर आंबा उत्पादक शेतकरी सत्यनारायण रेड्डी यांनी आपल्या आंबा पिकाला खत, पाणी, फरवारणी यांचे योग्य ते नियोजन केले. त्यांनी आंबा पिकावरील हॉपरच्या (तुडतुडे) नियंत्रणासाठी आंब्याच्या झाडांना (Success Story) मोहोर येतो. त्यावेळी प्रत्येक आठवड्याला 7 ग्रॅम प्रति लीटर पाण्याच्या प्रमाणात लिंबू साबणाचा उपयोग केला. फळमाशीच्या नियंत्रणासाठी त्यांनी आंबा बागेत कामगंध सापळे लावले. याशिवाय खोड किडीसाठी देखील त्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपाय केले. ज्यामुळे त्यांना अधिकचे उत्पादन मिळण्यास फायदा झाला.

किती मिळतोय वार्षिक नफा?

आंबा उत्पादक शेतकरी सत्यनारायण रेड्डी सांगतात, यावर्षी आपल्या आंबा बागेतून आपल्याला आतापर्यंत हापूस आणि मल्लिका या दोन्ही प्रजातीच्या आंबा झाडांपासून 30 एकरात एकूण 5,96,040 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. प्रामुख्याने योग्य मार्गदर्शनातून आपल्या आंबा उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आंबा पीक घेताना वेळोवेळी आपल्या जवळच्या कृषी विभाग किंवा संबंधित क्षेत्रातील जाणकार यांची मदत घ्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवण्यास मदत होते. असे आवाहनही त्यांनी शेवटी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.

error: Content is protected !!