Success Story : 5 किलो बियाण्यात, एकरी 40 क्विंटल गहू उत्पादन; शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात प्रामुख्याने (Success Story) नाशिक, जळगाव, धुळे, संभाजीनगर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गहू लागवडीखालील क्षेत्र आहे. यंदा पाण्याची कमतरता असतानाही गोदावरीच्या खोऱ्यात ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते. अशा शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी गहू उत्पादन घेतले आहे. राज्यातील अनेक भागांत सध्या गहू काढणी हंगाम जोरात सुरु आहे. अशातच आता एक शेतकरी केवळ 5 किलो गहू बियाण्यातून विक्रमी 40 क्विंटल उत्पादन घेत असल्याचे समोर आले आहे. तुम्हालाही हे एकूण नक्कीच नवल वाटले असेल. मात्र, हे खरे असून कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी देखील या शेतकऱ्याच्या शेताला भेट देत याबाबत माहिती घेतली आहे. आज आपण या शेतकऱ्याच्या गहू शेतीच्या यशाबद्दल (Success Story) जाणून घेणार आहोत.

कसे केले बियाणे उपलब्ध (Success Story Of Wheat Farming Farmer’s Unique Experiment)

शेतकरी दिनेशचंद तेनगुरिया असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील पीपला गावचे रहिवासी आहेत. ते सध्या इस्रायली बियाण्याच्या माध्यमातून गहू शेती (Success Story) करत आहे. शेतकरी दिनेशचंद यांचे एक नातेवाईक इस्राईलमध्ये स्थायिक आहे. त्यांच्याकडून त्यांनी प्रति किलो 700 रुपयाने दराने हे 10 किलो गहू बियाणे उपलब्ध केले होते. या बियाण्याच्या माध्यमातून त्यांचा शेती करण्याचा अंदाजच बदलून गेला असून, त्यांना भारतीय गहू बियाण्याच्या तुलनेत तीन पटीने अधिक उत्पादन मिळत असल्याचे ते सांगतात.

काय आहेत वैशिष्ट्ये?

शेतकरी दिनेशचंद तेनगुरिया सांगतात, आपण हे बियाणे उपलब्ध केल्यानंतर आपल्याला पहिल्याच वर्षी भरघोस गहू उत्पादन मिळाले आहे. या विदेशी बियाण्याची पेरणी केल्यानंतर त्याला जवळपास 20 दिवसांनी पहिले पाणी देण्याची गरज असते. विशेष म्हणजे या इस्रायली बियाण्याच्या गव्हाची ओंबी ही भारतीय गहू बियाण्याच्या तीन पट अधिक मोठी असते. याशिवाय या बियाण्याच्या ओंबीला येणारे दाणे हे प्रामुख्याने वजनदार आणि अधिक मोठे असतात. परिणामी, शेतकरी दिनेशचंद यांच्या या अनोख्या गहू शेतीची सध्या सर्वदूर चर्चा होत आहे.

किती मिळाले उत्पादन?

एक एकर शेतीमध्ये गहू पेरणीसाठी या इस्रायली वाणाच्या गहू जातीचे (Success Story) केवळ 5 किलो बियाणे पुष्कळ असते. तर त्यातून आपल्याला एकरी जवळपास 40 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे शेतकरी दिनेशचंद तेनगुरिया सांगतात. या गव्हाचा दाणा जाड आणि खूप वजनदार असतो. या गव्हाला आपण पूर्णतः जैविक पद्धतीने वाढवले आहे. त्याच्या पोळ्या देखील खाण्यास चविष्ट असल्याचे ते अनुभवातून सांगतात. याशिवाय स्थानिक कृषी विभागातील अधिकऱ्यांनी आपल्या या अनोख्या गहू शेतीचे कौतुक केले असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले आहे

error: Content is protected !!