Success Story : 60 वर्षीय शेतकरी करतोय 40 एकरात सेंद्रिय शेती; 8 देशी गायींचे संगोपन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी सध्या सेंद्रिय शेतीकडे (Success Story) वळत आहेत. इतकेच नाही तर राज्य सरकारकडून देखील शेतकऱ्यांना विषमुक्त शेतीसाठी प्रोत्साहित केले जात आहे. दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकार आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ यांच्यामध्ये नैसर्गिक शेतीसाठी करार झाला आहे. ज्यामुळे शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करण्यास मदत होत आहे. आज आपण अशाच एका 60 वर्षीय सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जे गाईचे गोमूत्र आणि शेण यापासून शेतीमधून दुप्पट उत्पन्न (Success Story) मिळवत आहेत.

8 देशी गायींचे पालन (Success Story 60 Year Old Farmer Organic Farming)

प्रेमचंद शर्मा असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्याच्या खरखोदा गावचे रहिवासी आहे. शेतकरी प्रेमचंद यांचे वय 60 वर्ष इतके असून, ते देशी गायीचे शेण आणि गोमूत्राच्या माध्यमातून शेती (Success Story) करतात. ते सांगतात, आपल्याकडे गायीचे 15 लिटर गोमूत्र जमा झाल्यानंतर आपण ते आपण 200 लिटरच्या ड्रममध्ये टाकतो. त्यात दोन किलो बेसन पीठ, दोन किलो गूळ टाकला जातो. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी त्यात पूर्णपणे शेण मिसळले जाते. या विधीमुळे शेण चांगल्या खादीमध्ये परावर्तित होते. त्यानंतर हे खत शेतीमध्ये वापरले जाते. यासाठी आपण एकूण 8 देशी गाय पाळल्या असलयाचे ते सांगतात.

गहू, ऊस आणि मोहरीची शेती

शेतकरी प्रेमचंद शर्मा यांच्याकडे आपली 40 एकर जमीन आहे. ज्यामध्ये ते जैविक पद्धतीने गहू, ऊस आणि मोहरीचे उत्पादन घेतात. सुरुवातीला ते आपली केवळ एक एकर जमीन करत होते. मात्र, त्यातून त्यांचा घर खर्च चालवणे देखील अवघड जात होते. मात्र, आज ते 40 बिघ्यामध्ये जैविक पद्धतीने पिकांची लागवड करत आहे. ज्यामुळे त्यांना आपल्या पिकांच्या माध्यमातून दुप्पट उत्पन्न मिळण्यास मदत होत आहे. विशेष म्हणजे जैविक पद्धतीने शेती केल्याने, त्यांच्या शेतामध्ये उत्पादित माल काढणीला येण्याच्या, आत ग्राहकांची त्यास मागणी असते. देशभरातील लोक त्यांच्याकडे धान्य खरेदीसाठी संपर्क करतात.

जैविक कीटकनाशकांची मदत

शेतीमध्ये कडुनिंबाचे झाड (Success Story) सर्वोत्तम मानले जाते. या कडुनिंबाचा देखील शेतकरी प्रेमचंद शर्मा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. ते एका 200 लिटरच्या ड्रममध्ये कडुनिंबाची पाने, निंबोळी, लसूण, कांदा आणि हिरवी मिरची यांचे मिश्रण करून चांगले मिसळून घेतात. हे मिश्रण ते पिकांवर फवारणी करतात. ज्यामुळे त्यांच्या पिकांवर किडींचा कोणताही प्रादुर्भाव होत नाही. याशिवाय या जैविक कीटकनाशकांच्या मदतीने त्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन, त्यांना अधिक उत्पन्न मिळण्यास मदत होते.

शेतकऱ्यांकडून ‘मास्टर’ ही उपाधी

विशेष म्हणजे शेतकरी प्रेमचंद शर्मा यांचे नैसर्गिक शेतीमधील कार्य पाहून, त्यांना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले जाते. शेतकऱ्यांकडून प्रेमचंद शर्मा यांना ‘मास्टर’ ही उपाधी देण्यात आली आहे. सर्व शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळत असतील, तर त्यांच्या उत्पादन खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे. जैविक शेतीमध्ये जैविक खते आणि खाद जसे की कंपोस्ट खत, वर्मी कंपोस्ट खत, गायीच्या शेणाचे खत आदींचा उपयोग केला जातो. या सर्वच गोष्टी शेतकऱ्यांना घरी तयार करणे शक्य आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना जैविक शेतीकडे वळण्याची गरज असल्याचेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.

error: Content is protected !!