Success Story : प्राध्यापकाची नोकरी सोडली; नाशिकमध्ये सफरचंदाची यशस्वी शेती फुलवली!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक जिल्हा म्हटले की आपल्याला सर्वप्रथम द्राक्ष बागा (Success Story) आणि कांद्याची शेती आठवते. मात्र, आता याच नाशिक जिल्ह्यात एका शेतकऱ्याने सफरचंदाची यशस्वी शेती करून दाखवली आहे. थंड हवामानात वाढणाऱ्या सफरचंदाची शेती ही मुख्यतः जम्मू काश्मीर या राज्यात केली जाते. मात्र, शेतीला आधुनिक तत्रंज्ञानाची जोड देत, या शेतकऱ्याने ही थंड हवामानातील सफरचंद शेती नाशिक जिल्ह्यामध्ये फुलवली आहे. ज्यामुळे त्यांच्या या सफरचंद शेतीची सध्या सर्वदूर चर्चा होत आहे. आज आपण या शेतकऱ्याच्या सफरचंद शेतीची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

नोकरीला ठोकला रामराम (Success Story Of Apple Farming)

भरत बोलीज असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते निफाड तालुक्यातील पालखेड (मिरचीचे) येथील रहिवासी आहे. त्यांची स्वतःची पाच बिघे अर्थात अडीच एकर शेती असून, ते सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी (Success Story) करत होते. मात्र त्यांना शेतीचे आवड असल्याने, त्यांनी आपल्या नोकरीला रामराम ठोकला आणि गावी येऊन फळशेती करण्याचा निर्णय घेतला.द्राक्ष शेतीला दरवर्षी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका बसत असल्याने त्यांनी शेतीत काहीतरी नवीन करण्याचे ठरवले.

लवकरच सफरचंदाचे हार्वेस्टिंग

त्यानुसार शेतकरी भरत बोलीज यांनी हिमालयीन शिमला ‘अँना’ या जातीची 30 सफरचंदाची रोपे उपलब्ध केली. या रोपांची त्यांनी मार्च 2023 मध्ये आपल्या शेतामध्ये सुयोग्य नियोजन करून लागवड केली. त्यांच्या या तीस झाडांना आता वर्षभराच्या आतच मोठ्या प्रमाणात सफरचंद लगडली आहेत. येत्या महिनाभरात आपण सफरचंदाचे हार्वेस्टिंग करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे काश्मीरी सफरचंद बाजारात येण्याच्या आत आपल्या शेतातील सर्व सफरचंद बाजारात येणार असल्याने आपल्याला अधिकचा दर मिळणार असल्याचे ते सांगतात. सफरचंदाच्या या प्राथमिक स्तरावरील यशानंतर आपण सफरचंदाचे क्षेत्र वाढवणार असल्याचे शेतकरी भरत बोलीज यांनी म्हटले आहे.

40 हुन अधिक फळांची शेती

शेतकरी भरत बोलीज यांनी सफरचंदाशिवाय सध्यास्थितीत आपल्या अडीच एकर शेतात चाळीसहून अधिक प्रकारची फळांची शेती फुलवली आहे. यामध्ये त्यांनी तैवान जातीची पेरूची बाग, काश्मिरी रेड बोर, पायनपल एमडी टू , बारामाही फळ असणारा केसर आंबा, चिकू, नारळ, खजूर, केळी, ड्रॅगन व यलो ड्रॅगन, नागपुरी संत्रा, जम्बो मोसंबी, ग्रेप फ्रुट, अंजीर आदींसह विविध प्रजातीचे 40 ते 50 फळ देणारी बाग तयार केली आहे. यातून वार्षिक 20 ते 25 लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना हमखास मिळत असल्याचे शेतकरी भरत बोलीज सांगतात. अशातच त्यांनी यावर्षी सफरचंद शेतीचा यशस्वी प्रयोग केल्याने उत्पन्नात आणखी वाढ होणार असल्याचे ते सांगतात.

error: Content is protected !!