Success Story : साताऱ्यातील इंजिनिअर तरुणाची कमाल; सफरचंद लागवडीचा यशस्वी प्रयोग!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील सुशिक्षित तरुण सध्या शेती क्षेत्राकडे (Success Story) ओढले जात आहे. इतकेच नाही तर अनेक तरुण शेतकरी सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक गोष्टींही शक्य करून दाखवत आहे. तसेच नवनवीन पिकांची लागवड करत मोठी कमाई देखील मिळवत आहेत. आज आपण अशाच एका इंजिनिअर तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने काश्मीर या थंड प्रदेशातील सफरचंद या फळाची सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात यशस्वी लागवड (Success Story) करून दाखवली आहे.

नावीन्यतेचा ध्यासातून सुचली कल्पना (Success Story Of Apple Farming)

अनिल दुधाणे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून, त्याने महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या खिंगर या गावात सफरचंदाची लागवड केली आहे. विशेष म्हणजे अनिल दुधाणे हे उच्चशिक्षित असून, त्यांनी इंजिनिअरिंगपर्यंतचे शिक्षण (Success Story) घेतले आहे. मात्र आपल्याला शेतीमध्ये आवड असल्याने आपण शेतीमध्ये काही नवीन करण्याची दाखवून खूणगाठ मनाशी बाळगून होतो. त्यातूनच सफरचंद लागवडीची कल्पना मनात आली. आणि त्यानुसार आपण त्याबाबत माहिती मिळवून सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला. यासाठी आपण वातावरणासह सर्व बाबी पडताळून पहिल्या असे ते सांगतात.

हिमाचल प्रदेशहुन आणली रोपे

सफरचंद लागवड करण्याचा निर्णय पक्का झाल्यानंतर, त्यांनी हिमाचल प्रदेश या राज्यातून जातिवंत सफरचंदाची रोपे उपलब्ध केली. यामध्ये त्यांनी सोनेरी, रेड डेलिशिअस, लाल अंबरी, मॉकीटोश व हार्मोन-९९ या जातींची वीस रोपे आणली. व सर्व रोपांची त्यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्या शेतामध्ये लागवड केली. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या सफरचंदाच्या झाडांना कोणतेही रासायनिक खत कीटकनाशकांचा वापर केलेला नाही. ठिबकच्या माध्यमातून त्यांनी झाडांना सूक्ष्म अन्नद्रवे देण्याचे सुयोग्य नियोजन करून प्रभावीपणे सफरचंद उत्पादन घेतले आहे.

हार्मोन-९९ प्रजाती सर्वोत्तम

सध्या त्यांच्या सर्व जातीच्या सफरचंद झाडांना मोठ्या प्रमाणात सफरचंद लगडली आहेत. तर हार्मोन-९९ या प्रजातीचे सफरचंद काढणीला आले असल्याचे शेतकरी अनिल दुधाणे सांगतात. ते म्हणतात आपण सफरचंद सध्या २० झाडांच्या माध्यमातून सुरु केलेली असली तरी त्याचा आपल्याला खूप मोठा आर्थिक होणार आहे. कारण झाडांना चांगल्या पद्धतीने फळे आल्याने, येत्या काळात आपली सफरचंदाची बाग वाढवण्याचा आपला विचार आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या अनुभवातून सफरचंद लागवडीसाठी हार्मोन-९९ ही प्रजाती सर्वोत्तम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या जातीच्या झाडाची उंची १२ फूट आणि ही प्रजाती ४० ते ४५ अंश तापमानात सुयोग्यपणे वाढत असल्याचे त्यांनी शेतवती म्हटले आहे.

error: Content is protected !!